Virat Kohli Net Worth cross over Rs 1000 Crore salary to advertisement Check Full Details  
क्रीडा

Virat Kohli Net Worth: किंग कोहलीचा श्रीमंतीत हजार कोटींचा टप्पा पार! 'असे' कमवतो इतके पैसे

रोहित कणसे

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची संपत्ती एक हजार कोटींच्या पुढे गेली आहे. इन्स्टाग्रामवर २५२ मिलीयन फॉलोअर्स असलेल्या कोहलीच्या एकूण संपत्तीबाबत स्टॉक ग्रोने हा खुलासा केला आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराची एकूण संपत्ती १०५० कोटी रुपयांवर गेली आहे. जगातील सर्व क्रिकेटपटूंमध्ये हे सर्वाधिक आहे.

अवघे ३४ वर्ष वय असलेला कोहलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने त्यांच्या कराराच्या यादीत 'ए प्लस' (A+) श्रेणीत ठेवले आहे. त्यामुळे कोहलीली करारानुसार मंडळाकडून वर्षाला सात कोटी रुपये मिळतात. याशिवाय बीसीसीआय त्याला कसोटी खेळण्यासाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० सामना खेळण्यासाठी ३ लाख रुपये देते.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) विराट कोहलीला एका हंगामासाठी १५ कोटी रुपये देते. खेळाव्यतिरिक्त कोहलीकडे अनेक ब्रँड्स आहेत. तसेच त्याने ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्व्होसह सात स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे.

जाहिरातींमधून १७५ कोटींची कमाई

विराट कोहली हा जाहिरातदारांचा लाडका आहे. तो १८ हून अधिक ब्रँड्सच्या जाहिराती करतो . विराट प्रत्येक जाहिरात शूटसाठी वर्षाला ७.५० ते १० कोटी रुपये घेतो. या बाबतीत तो बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आहे. अशा ब्रँड एंडोर्समेंटमधून तो सुमारे १७५ कोटी रुपये कमावतो. याशिवाय विराट फुटबॉल, टेनिस आणि कुस्ती संघांचाही मालक आहे.

कोहली सोशल मीडियाचा देखील किंग

सोशल मीडियाबद्दल बोलायचे झाले तर कोहली इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी ८.९ कोटी रुपये घेतो. त्याचवेळी, ट्विटरवर तो एका पोस्टसाठी अडीच कोटी रुपये घेतात. विराटची दोन घरे आहेत. मुंबईतील घराची किंमत ३४ कोटी रुपये आणि गुरुग्राममधील घराची किंमत ८० कोटी रुपये आहे. याशिवाय त्याला कारचाही शौक आहे. विराट ३१ कोटी रुपयांच्या लक्झरी कारचाही मालक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT