Virat Kohli playing for Pakistan video being viral  
क्रीडा

Video : विराट खेळणार पाककडून ट्वेंटी20 वर्ल्ड कप, काय आहे हे प्रकरण?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विश्वकरंडक 2019मध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर विराट कोहलीची जर्सी घालून त्याचा एक चाहता गाडीवर फिरत होता. तोवर सारं ठाक होतं मात्र, आता पाकिस्तानने हद्द पार केली आहे. पाकिस्तान मध्ये सध्या विराट कोहली पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमिन सरकली आणि तो पातळी सोडून वागायला लागले.ल पाकच्या पंतप्रधानांनी भारतावर अण्वस्त्र हल्ला करू अशी धमकीही दिली होती. त्यांच्या या धमकीचं तिथल्या लोकांनी खरंच मनावर घेतलं. इतकंच काय त्यांनी कल्पना सत्यात उतरली तर काय होईल हेसुद्धा डोळ्यासमोर आणलं. यात पाकिस्तान भारताला अणुयुद्धात पराभूत करेल आणि विराट कोहली पाकिस्तानकडून खेळेल असं सांगणारा व्हिडिओ सध्या त्यांच्याकडून शेअर केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये सुरु असलेला सामना 2025मध्ये होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकाचा अंतिम सामना आहे. हा सामना श्रीनगरमध्ये सुरु असून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात हा सामना सुरु आहे. सामन्याची कमेंट्री करणाऱ्यानं म्हटलं की, पाकिस्तानकडे दोन खास फलंदाज आहेत. बाबर आझम आणि विराट कोहली. यावेळी व्हिडिओत टीव्ही पाहणाऱ्या कुटुंबातील मुलगी म्हणते की, विराट कोहलीच सामना जिंकून देणार. त्यावर कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणतो की, आधी कोहली भारतासाठी खेळत होता. त्यावेळी मुलगा म्हणतो की, कोण भारत?

बघा व्हिडिओ :

यानंतर व्हिडिओमध्ये एक नकाशा येतो आणि यामध्ये भारत आणि बांगलादेशवर हिरवा रंग पसरलेला दिसतो. या व्हिडिओवर आता तुफान प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT