Virat Kohli  esakal
क्रीडा

Virat Kohli : वर्ल्डकपमध्ये 8 डावात 5 अर्धशतके! विराट कोहलीनं वाढदिवसालाच घातला विक्रमांचा रतीब

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील इडन गार्डनवर होत असलेला सामना विराट कोहलीसाठी खूप खास आहे. आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. त्याने आपल्या वाढदिवसादिवशीच आव्हानात्मक खेळपट्टीवर झुंजार अर्धशतक करत भारताला चांगल्या स्थितीत पोहचवले. विराट कोहलीने श्रेयस अय्यर सोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली. याचबरोबर अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने आक्रमक सुरूवात केली. रोहित शर्माने 24 चेंडूत 40 धावा चोपत 6 षटकातच 62 धावांची सलामी दिली. मात्र रोहित 40 तर गिल 23 धावा करून बाद झाला अन् विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यावर डाव पुढे नेण्याची जबाबदारी आली.

फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर विराट कोहलीने सावध फलंदाजी करत डाव सावरला. विराट कोहलीने वाढदिवसादिवशी अर्धशतकी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

विराट विक्रम

  • विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये भारतात 6000 धावा करणारा सचिननंतरचा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

  • विराट कोहली वर्ल्डकपमध्ये 1500 धावा पूर्ण करणारा सचिन नंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

  • विराट कोहीलने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 8 डावात सहावेळा 50 धावांपेक्षा जास्त केल्या आहेत. याच बांगलादेशविरूद्धच्या शतकाचा देखील समावेश आहे.

  • विराट कोहली हा वनडे इतिहासात सर्वाधिकवेळा 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

  • सचिन तेंडुलकरने 452 डावात 145 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 278 डावात 119 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

  • विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपल्या 500 धावा देखील पूर्ण केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT