Virat-Rohit-Sad 
क्रीडा

भारताच्या 'फ्लॉप शो'नंतर माजी क्रिकेटर विराट, रोहितवर संतापला

विराज भागवत

अवघ्या ७८ धावांमध्ये 'टीम इंडिया'ची फलंदाजी ढेपाळली

Ind vs Eng 3rd Test: 'टीम इंडिया'साठी (Team India) तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय विचित्र होता. भारताच्या पहिला पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये आटोपला. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा साऱ्याच फलंदाजांनी इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे गुडघे टेकले. त्यामुळे भारताला शंभरीही गाठता आली नाही. भारताच्या 'फ्लॉप शो'नंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) रोहित आणि विराटवर चांगलाच भडकल्याचे दिसले.

Inzamam-ul-Haq

रोहित शर्माने संथ खेळी करत एक बाजू लावून धरण्याचा आतोनात प्रयत्न केला. त्याने १०५ चेंडूंचा सामना करत १९ धावा केल्या. पण पुल शॉट मारताना तो झेलबाद झाला. विराटला तर तेवढीही झुंज देता आली नाही. १७ चेंडूत ७ धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला. त्याबद्दल बोलताना पाकिस्तानचा इंजमाम उल हक या दोघांवर संतापला. "विराट आणि रोहित हे महत्त्वाचे आणि बडे खेळाडू आहेत. त्यांनी जबाबादारी घेऊन खेळायला शिकलं पाहिजे. १०५ चेंडू खेळल्यानंतरही तुम्ही पिचवर सेट कसे काय होत नाही? एवढे चेंडू खेळताना केवळ १९ धावा केल्या जात असतील तर तुम्ही मध्येमध्ये धावा काढण्याचा पर्याय शोधायला हवा. विराटनेही १७ चेंडू खेळले. पण त्यात त्याला फारसं काही करता आलं नाही. ७ धावा काढून तो बाद झाला. त्याला धावा करण्यापासून रोखण्यात इंग्लंडचे गोलंदाज पूर्णपणे यशस्वी झाले", अशा शब्दात इंजमामने रोहित आणि विराटवर सडकून टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT