Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli: 'विराट नावाचा एलियन आला, त्यानं...' आजी- माजी पाकिस्तानी क्रिकेटर बोललेच!

विराटच्या विराट फलंदाजीची भुरळ आता जगभरातील क्रिकेटप्रेमींना पडली आहे. सध्याच्या घडीला सगळीकडून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli Viral News: विराटच्या विराट फलंदाजीची भुरळ आता जगभरातील क्रिकेटप्रेमींना पडली आहे. सध्याच्या घडीला सगळीकडून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. कालच्या सामन्यात विराटनं केलेली कामगिरी ही अनेकांच्या हदयात घर करून गेली आहे. विराटच्या आतापर्यतच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी होती असे अनेकांचे म्हणणे आहे. केवळ भारतीयच नाहीतर पाकिस्तानी चाहत्यांनी देखील विराटचं कौतूक केलं आहे.

यासगळ्यात आजी - माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी देखील विराटवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी त्याला त्याच्या आगामी करिअरसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मेलबर्नमध्ये झालेल्या त्या सामन्यानं अनेकांना मोठा आनंद दिला आहे. दिवाळींच अनोख गिफ्ट चाहत्यांना मिळालं आहे. विराटच्या खेळीचे सोशल मीडियावर वारेमाप कौतूक होतंय. त्यानं 53 चेंडूत 82 धावा काढून भारताच्या विजयाचा शिल्पकार होण्याचा मान मिळवला होता.

पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी विराटची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम म्हणाले की, मला तर कोहली हा एलियनच वाटला. तो आला त्यानं पाहिलं आणि ज्याप्रमाणे खेळ केलास त्यानं सर्वांना जिंकून घेतलं. विराटची ती खेळी ही वादळी होती. भारताच्या विजयात त्याचे योगदान महत्वाचे होते. त्यानं गेल्या 15 वर्षांपासून भारतीय संघासाठी खूप काही दिले आहे. मी पाहिलेला आतापर्यतचा सर्वोत्कृष्ट फलंदाज असे त्यांनी विराटचे कौतूक केले आहे.

याशिवाय पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज, वहाब रियाज, शोएब मलिक यांनी देखील कोहलीचे कौतूक केले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं कोहली आणि पांड्यानं सामन्याचा रंगच बदलून टाकला. भारताच्या त्या विजयाचे श्रेय कोहली आणि पांड्याला द्यावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment News : Google pay, PhonePe, Paytm ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! युपीआय पेमेंटवर शुल्क लागणार? संसदेत विधेयक

Amravati Rain: जुलै अखेरच्या पावसाने पावणेदोन लाख हेक्टरतील पिके उद्ध्वस्त; दहा जणांचा बळी, सर्वाधिक नुकसान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात

पुणे-नाशिक महामार्गावर सकाळीच भीषण दुर्घटना; ट्रकची समोरासमोर भीषण धडक, वाहतूक खोळंबली

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात एनालॉग आणि कृत्रिम पनीरवर पूर्ण बंदी

Pune Railway: प्रवास संपला, पण बेडशीट घरी! रेल्वेत प्रवाशांची ‘हातसफाई’; पुणे स्थानकातून तब्बल तीन कोटींचे अंथरुण-पांघरुण, टॉवेल चोरले

SCROLL FOR NEXT