Virat Kohli  esakal
क्रीडा

विषय इथेच संपतो; कॅप्टन्सीवर कोहली असं का म्हणाला?

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाच्या नेतृत्व सोडण्याच्या निर्णयावर विराट कोहलीनं (Virat Kohli) पहिल्यांदाच खुलेपणाने प्रतिक्रिया दिलीये. लोक आपआपल्या परिनं विचार करत असतात. त्यांच्या काही अपेक्षा असतात. एखादा क्रिकेटर जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय घेतो त्यावेळी त्यांना हे कसं झालं? असा प्रश्न पडतो. काहीजण आश्चर्यचकित होतात. बाहेर बसलेल्या लोकांना क्रिकेटरच्या निर्णयामागची कारण समजणं मुश्किल असते, असेही तो म्हणालाय.

विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच टी-20 संघाचे नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली होती. याच वेळी त्याने आयपीएल (IPL) स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्वही करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. वनडे आणि कसोटीत नेतृत्व कायम ठेवणार असेही तो म्हणाला होता. पण त्याच्या एका निर्णयामुळे सगळीच गणित बिघडली. वनडे संघाच कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आलं. कसोटीत तीच वेळ येऊ नये म्हणून त्याने दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले.

विराट कोहलीने आरसीबी पॉडकास्टमध्ये कॅप्टन्सीच्या मुद्यावरुन मनमोकळ्या गप्पा केल्या. तो म्हणाला की, गरजेपेक्षा अधिक गोष्टी मला हव्या हव्या वाटत नाहीत. जर एखाद्या कामात मला आनंद मिळत नसेल तर ते करत नाही. हा निर्णय घेण्यामागचे कारण बाहेर बसलेल्या लोकांना कळणार नाही, असेही तो म्हणाला. 100 वी कसोटी खेळण्याच्या उंबरठ्यावर असलेला कोहली पुढे म्हणाला की, मी घेतलेला निर्णय आश्चर्यकारक अजिबात नाही. मला स्पेस हवी होती. वर्कलोड कमी करायचा होता. विषय इथेच संपतो. यापलिकडे दुसरे कोणतेही कारण नाही, अशा शब्दांत त्याने कॅप्टन्सीच्या मुद्यावरीच चर्चेला आता पूर्णविराम द्या, असेच म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT