Virat Kohli  esakal
क्रीडा

Virat Kohli : 2011 चा वर्ल्डकप जिंकला मात्र त्याचं महत्व... विराट कोहलीनं केलं मोठं वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli : भारतीय क्रिकेट इतिहासात 2011 चा वनडे वर्ल्डकप जिंकणं हा एक ऐतिहासिक क्षण होता. यानंतर 12 वर्षे झाली भारताला अजून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताच्या 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या संघात विराट कोहलीचा देखील समावेश होता. त्यावेळी तो 23 वर्षाचा होता.

विराट कोहलीने वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेतलं होतं. हाच विराट कोहली आता ऑक्टोबर महिन्यात मायदेशात वर्ल्डकप खेळणार आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा वर्ल्डकप विराटचा शेवटचा वर्ल्डकप असण्याची शक्यता देखील आहे.

दरम्यान, वर्ल्डकप 2011 बद्दल विराट कोहलीने काही प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तो म्हणाला की, 'माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण हा 2011 चा वर्ल्डकप जिंकणं हाच आहे. मी त्यावेळी 23 वर्षाचा होतो. त्यावेळी मला बहुदा वर्ल्डकप जिंकणं काय असतं याची जाणीव नव्हती. मात्र आता मी 34 वर्षाचा झालो आहे. मी अनेक वर्ल्डकप खेळले आहेत. आम्ही ते जिंकू शकलेलो नाही.'

'2011 च्या वर्ल्डकप संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या भावनांची जाणीव मला होत आहे. सचिन तेंडुलकरचा तर तो शेवटचा वर्ल्डकप होता. त्याने खूप वर्ल्डकप खेळले होते. शेवटी मुंबईत वर्ल्डकप जिंकला. होमटाऊनमध्ये वर्ल्डकप जिंकणे त्याच्यासाठी खास होतं.'

पीटीआयशी बोलताना विराट कोहली पुढं म्हणाला, 'मला माहिती होतं की खेळाडूंवर प्रवास करताना केवढा दबाव होता. त्यावेळी सोशल मीडिया इतका प्रभावी नव्हता. नाहीतर ते एक वाईट स्वप्नच ठरलं असतं. मात्र विमानतळावर एकच गोष्ट ऐकायला मिळायची. आम्हाला वर्ल्डकप जिंकायचा आहे. वरिष्ठ खेळाडूंनी हा दबाव चांगल्या प्रकाराने हाताळले. ते खूप चांगले होते. वर्ल्डकप जिंकलेली रात्र तर खासच होती.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT