Virat Kohli Most runs in T20 World Cups
Virat Kohli Most runs in T20 World Cups esakal
क्रीडा

Virat Kohli : विक्रम मोडला! किंग कोहली आता टी 20 वर्ल्डकपमधील 'राजा'माणूस

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Most runs in T20 World Cups : भारताची रन मशिन विराट कोहली ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला. हा फॉर्म त्याने वर्ल्डकपमध्ये देखील कायम ठेवला असून त्याने पाकिस्ताविरूद्ध सामना जिंकून देणारी 82 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. आता त्याने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या विक्रमाने विराट कोहलीने टी 20 क्रिकेट फॉरमॅटमधून विराट कोहलीने निवृत्ती घेतली पाहिजे असं म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

विराट कोहलीने टी 20 वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करण्याचा महेला जयवर्धनेचा विक्रम मोडला. आता या सिंहासनावर विराट कोहली विराजमान झाला आहे. महेला जयवर्धनेने टी 20 वर्ल्डकपमध्ये 1016 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने बांगलादेशविरूद्ध 15 धावांचा टप्पा गाठला आणि जयवर्धनेचा हा विक्रम मोडला. आता टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावावर आहे.

टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फंलंदाज

विराट कोहली 1017* धावा

महेला जयवर्धने 1016 धावा

ख्रिस गेल 965 धावा

रोहित शर्मा 921 धावा

तिलकरत्ने दिलशान 897 धावा

याचबरोबर टी 20 वर्ल्डकपमधील सरासरीत देखील विराट कोहली अव्वल आहे. त्याची सरासरी 88.8 इतकी असून या यादीत त्याच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा माईक हसी 54.6 सरासरी राखत दुसऱ्या स्थानावर आहे. तर केविन पिटरसन 44.6 सरासरी राखत तिसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीने टी 20 वर्ल्डकपमध्ये अर्धशतके ठोकण्यातही आपणच अव्वल असल्याचे दाखवून दिले. त्याने आतापर्यंत टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 13 अर्धशतके केली आहेत. त्या खालोखाल 9 अर्धशतके करणाऱ्या रोहित शर्मा आणि ख्रिस गेलचा संयुक्तरित्या दुसरा क्रमांक लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून होणार दाखल

Water Storage : पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

Sakal Vastu Expo : स्वप्नातील घर आता सत्यात अवतरणार

Illegal Hoarding : पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्य होर्डिंग्ज ठरताहेत ‘काळ’

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

SCROLL FOR NEXT