Virat Kohli Surpasses Rahul Dravid  esakal
क्रीडा

Virat Kohli : सचिन तेंडुलकरनंतर आता विराट कोहलीच! 'द वॉल' राहुल द्रविडला टाकले मागे

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Surpasses Rahul Dravid : भारताने ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) विरूद्धचा तिसरा टी 20 सामना एक चेंडू आणि सहा गडी राखून जिंकला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांची मालिका 2 - 1 अशी खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून विराट कोहलीने 63 धावांची दमदार खेळी केली. त्याने सूर्यकुमार यादवच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. सूर्याने 69 धावांची आक्रमक खेळी केली. दरम्यान, विराट कोहलीची ही विक्रमी अर्धशतकी खेळी ठरली.

आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध नाबाद 122 धावांची शतकी खेळी करत विराट कोहलीने आपण पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये परत आल्याचे संकेत दिले. याचवेळी त्याने रखडलेले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकत रिकी पॉटिंगशी बरोबरी साधली होती. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या निर्णायक सामन्यात त्याने 63 धावांची झुंजार खेळी करत मालिका विजयात मोठी भुमिका बजावली. याचबरोबर विराट कोहलीने प्रशिक्षक आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा विक्रम देखील मोडला. आता विराट कोहली भारताकडून दुसऱ्या क्रमकांचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज (India's Second Highest Run-Scorer) ठरला आहे.

राहुल द्रविडने 504 सामन्यात 599 डावात 24 हजार 064 धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 63 धावांची खेळी करत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत राहुल द्रविडला मागे टाकले. विराट कोहलीने आतापर्यंत 471 सामने खेळले असून 525 डावात 24 हजार 078 धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 664 सामन्यात 782 डावात फलंदाजी कररत 34 हजार 357 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT