Virat Kohli Record Break Inning esakal
क्रीडा

Virat Kohli : विराट कोहलीने इतिहास रचला! सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Record Break Inning : भारताने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला. सलामीवीर रोहित शर्मा (83 धावा) आणि शुभमन गिलने (70 धावा) 143 धावांची सलामी देत पाया रचला होता. त्यावर विराट कोहलीने कळस चढवला. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात विराट कोहलीने एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 19 षटकात 143 धावांची धडाकेबाज सलामी दिली. यानंतर विराट कोहलीने तेथून भारताचा डाव पुढे नेत विराट कोहलीने आपले 73 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. याचबरोबर विराट कोहलीने आपल्या वनडेमधील 12500 धावा देखील पूर्ण केल्या. या धावा पूर्ण करताना विराट कोहलीने इतिहास रचला.

विराट कोहली वनडे इतिहासात डावांच्या बाबतीत सर्वात वेगवान 12500 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला. त्याने सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकले. विराट कोहलीने 257 डावात वनडेतील 12500 धावा पूर्ण केल्या. तर सचिन तेंडुलकरने हा विक्रम 310 डावात केला होता. या यादीत आता सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग (328 डाव) आहे. (Sports Latest News)

मायदेशात सर्वात कमी डावात सर्वाधिक वनडे शतक ठोकणारे खेळाडू

  • विराट कोहली (भारत) 99 डाव 20 शतके

  • सचिन तेंडुलकर (भारत) 160 डाव 20 शतके

  • हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) 69 डाव 14 शतके

  • रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया) 151 डाव 14 शतके

सध्या खेळत असलेल्या खेळाडूमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू

  • विराट कोहली 73

  • डेव्हिड वॉर्नर 45

  • जो रूट 44

  • स्टीव्ह स्मिथ 42

  • रोहित शर्मा 41

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT