क्रीडा

World Cup 2019 : त्या 45 मिनिटांनी घात केला

सुनंदन लेले

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो होतो. उपांत्य सामन्यात फलंदाजी करताना पहिल्या 45 मिनिटांनी आमचा घात केला आहे. आम्ही खूप खराब खेळलो असे म्हणण्यापेक्षा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी फारच सुरेख मारा केला असे मी म्हणेन. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजीला खूप सोपी नव्हती. त्यातून बोल्ट आणि मॅट हेन्रीने खरच खूप मस्त मारा केला. मला स्वत:ला बाद मोठ्या स्पर्धेतील फेरीत मोठ्या धावा करता आलेल्या नाहीत याची खूप निराशा आहे. 

4 फलंदाज लवकर आणि एकूण 6 प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर जडेजा आणि धोनीने केलेला खेळ लक्षणीय होता. जडेजाने दाखवून दिले की तो किती मोलाचा खेळाडू आहे. त्याची आजची खेळी मी पाहिलेली त्याची सर्वोत्तम खेळी होती कारण सामन्याचे महत्त्व आणि दडपण प्रचंड होते. 

मला वाटते जिंकण्या नंतर जास्त दंगा करता कामा नये आणि पराभवानंतर खूप खचून जाता काम नये. भारतात खेळाची संस्कृती रुजण्याकरता आपल्याला खेळाडूंना हिरो  किंवा झिरो बनवले नाही पाहिजे. खेळात काहीही होऊ शकते. मोठ्या सामन्यात त्या दिवशी कसा होतो यावर सगळे अवलंबून असते हे आपण सगळ्यांनी जाणले पाहिजे. मला इतकेच सांगायचे आहे की चाहत्यांना भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला नसल्याने निराशा होणार. पण सर्वात जास्त दु:ख आम्हां खेळाडूंना होते हे लक्षात घ्या. झाल्या पराभवातून भारताचे तरुण खेळाडू खूप काही शिकतील आणि भविष्याकरता त्याचा फायदा होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT