IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathi sakal
क्रीडा

Virat Kohli Ind vs Eng : विराट कोहली तिसरा कसोटी सामन्यातून बाहेर? मोठी अपडेट आली समोर

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. सध्या दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जात आहे, मात्र लवकरच निवडकर्ते उर्वरित 3 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करू शकतात.

आता अशा परिस्थितीत सर्व चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, विराट कोहली पुढच्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? त्यामुळे यादरम्यान एक अपडेट आला आहे, मात्र विराट उर्वरित सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या मैदानाबाहेर आहे. इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा त्यात विराटचे नाव होते. मात्र त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव त्याने आपले नाव मागे घेतले.

विराट पुढील कसोटी सामना खेळणार की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी रजेची मागणी केली होती. विराट कोहलीच्या उपलब्धतेबद्दल आम्ही आत्ताच सांगू शकत नाही. 3 सामन्यांसाठी संघ निवडण्यास अजून वेळ आहे. विराट तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा भाग असेल की नाही हे काही दिवसांनीच कळेल.

इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात केएल राहुलचे पुनरागमन निश्चित आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. यासाठीचा संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र संघ कधीही जाहीर होऊ शकतो.

त्याचवेळी, पुढील 2 कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाच्या पुनरागमनाची फारशी आशा दिसत नाही. मात्र, आता संघात कोण पुनरागमन करणार आणि कोण नाही. टीम इंडियाची घोषणा झाल्यावरच हे स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT