Virat Kohli Historical Test Series Won in Australia  esakal
क्रीडा

Virat Kohli : सामना ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका अन् विराट कोहली होतोय ट्रेंड; काय आहे भानगड?

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Historical Test Series Won in Australia : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 104 तर उस्मान ख्वाजाने 368 चेंडूत नाबाद 195 धावा केल्या. मात्र तरी देखील हे दोघं सोशल मीडिायवर ट्रेंड होण्याऐवजी भारताचा सुट्टीवर असलेला विराट कोहली सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. विराट आजच्याच दिवशी (7 जानेवारी) ट्रेंड होण्याचे एक खास आणि ऐतिहासिक कारण आहे.

आजच्याच दिवशी विराट कोहलीच्या नेतृत्वात 2019 ला भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला होता. विराट सेना ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारी आशियातील पहिली टीम ठरली होती. यापूर्वी कधीही आशियातील संघाने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली नव्हती. मात्र विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इतिहास रचला विशेष म्हणजे त्या मालिकेत चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक धावा केल्या होत्या. भारताने मालिका 2 - 1 अशी जिंकली होती.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना अॅडिलेड ओव्हलमध्ये खेळला गेला. हा सामना भारताने 31 धावांनी जिंकला. पर्थमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिायने जोरदार पुनरागमन करत भारताला 146 धावांनी पराभूत केलं आणि मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आणली. मात्र तिसऱ्या मेलबर्न कसोटीत भारताने 137 धावांनी विजय मिळवत मालिकेत पुन्हा 2 - 1 अशी आघाडी घेतली. (Sports Latest News)

मालिकेचा शेवटचा सामना भारताने अनिर्णित राखण्यात यश मिळवले. याचबरोबर भारताने ऑस्ट्रेलियाची अवघड मोहिम फत्ते करत इतिहास रचला. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा कारनामा केला होता. मात्र विराट कोहलीला 2021 मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोडावे लागले. विराटने पहिल्यांदा टी 20 चे कर्णधारपद सोडले त्यानंतर त्याला वनडेच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आले होते.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT