Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : आवरा आता... विराट कोहलीनं लाखभर प्रेक्षकांसमोर रिझवानला केलं ट्रोल

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Mohammed Rizwan : भारत आणि पाकिस्तान सामना सुरू आहे अन् विराट कोहली शांत बसलाय असं कसं घडणं अशक्य आहे. वर्ल्डकप 2023 मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या हाय व्होल्टेज सामन्यात विराट कोहली देखील चांगलाच चार्जअप झाला आहे. तो मैदानावर उत्साहात वावरत असून कर्णधार रोहित शर्माला देखील पाकिस्तानची विकेट घेण्यासाठी सल्ला देताना दिसतोय.

दरम्यान, आक्रमक सुरूवात करणाऱ्या पाकिस्तानी सलामीवीरांना मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्याने धक्के दिले. त्यानंतर पाकिस्तानचा डाव सावरण्याची जबाबदारी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान याच्यावर आली. इमाम बाद झाल्यानंतर आलेल्या मोहम्मद रिझवानने क्रिजवर येण्यास आणि चेंडू खेलण्यास वेळ लावला. त्यामुळे विराट कोहली नाराज झाला होता.

विराट कोहलीने मोहम्मद रिझवान टाईम पास करत असल्याचे पाहून घड्याळाकडे पाहण्याची अॅक्शन करत त्याला ट्रोल केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारताने चांगली सुरूवात करणाऱ्या पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर 73 धावात माघारी धाडल्यानंतर पाकिस्तानची अनुभवी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी 82 धावांची भागीदारी रचली होती. ही जोडी भारताची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच सिराजरने बाबरला 50 धावांवर बाद केले.

त्यानंतर रिझवान 49 धावांवर पोहचला असातना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला. शादाब खान देखील बुमराहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पाकिस्तानची अवस्था 2 बाद 155 धावांवरून 7 बाद 171 धावा अशी झाली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निदा खान गर्भवती आहे की नाही? मुंबईत तपासणी, मेडिकल सर्टिफिकिट आलं समोर

CSK विरूद्धच्या सामन्याआधी काव्या मारनच्या SRH चा मोठा निर्णय! स्टार खेळाडूला दिली संघात एन्ट्री

Latest Marathi News Live Update: नेस्को ड्रग्स प्रकरणात फरार आरोपी रायगडच्या पोलादपूरमधून जेरबंद

रिलीजपूर्वीच स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेचा हिंदी रिमेक ! प्रोमो हुबेहूब पण भलत्याच चॅनेलवर होणार प्रसारित

Pune Crime : रात्रभर शटर बंद, आत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह! प्रेमसंबंधावरून पत्नीसह अल्पवयीन मुलीनं सेक्रेटरीचा केला खून; भाजपच्या विधी अध्यक्षांसह कुटुंबाला अटक

SCROLL FOR NEXT