Virat Kohli Water Boy Video esakal
क्रीडा

Virat Kohli : बॅटिंग करताना अन् पाणी देतानाही विराटचा उत्साह असतो तेवढाच; Video व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Water Boy Video : भारताचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपमधील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात संघात तब्बल 5 बदल केले. भारतीय संघ आधीच आशिया कपच्या फायनलमध्ये पोहचला असल्याने आजच्या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. यात विराट कोहलीचा देखील समावेश आहे.

दरम्यान, विराट कोहलीने विश्रांती काळात देखील स्वस्थ न बसता संघासाठी आपले योगदान दिले. तो वॉटर बॉय झाला अन् त्याने मैदानावर दमलेल्या खेळाडूंची तहान भागवली. विराट कोहली हा ज्या ज्यावेळी मैदानावर असतो त्या त्यावेळी तो आपल्या उत्साहीपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो.

जागतिक स्तरावरील एवढा मोठा खेळाडू असूनही आपल्या संघ सहकाऱ्यांना पाणी देतानाही विराट कोहलीने जो उत्साह दाखवला त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

दरम्यान, रोहित शर्माने बांगालेदशविरूद्धच्या सामन्यासाठी आपल्या संघात 5 बदल केले आहेत. त्याने विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव यांना विश्रांती दिली. त्यांच्या ऐवजी संघात तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशची टॉप ऑर्डर स्वस्तात गुंडाळली. शार्दुल ठाकूरने दोन तर मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेत बांगलादेशची अवस्था 4 बाद 59 धावा अशी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT