Virat Kohli Anger on Stump Mic After Dean Elgar DRS
Virat Kohli Anger on Stump Mic After Dean Elgar DRS  Sakal
क्रीडा

VIDEO : विराटनं DRS चा राग बॉल टॅम्परिंगकडे नेला; बघा काय घडलं

सुशांत जाधव

रागाच्या भरात त्याने कॅमेरा पर्सनचीही शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना केपटाउनच्या मैदानात सुरु आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेनं (South Afria) दोन विकेटच्या मोबदल्यात शंभरी पार केली होती. अजूनही त्यांना 111 धावांची गरज आहे. दुसरीकडे टीम इंडियाला (Team India) सामन्यासह मालिका जिंकून नवा इतिहास रचण्यासाठी आठ विकेट्सची गरज आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिन एल्गरच्या विरोधात टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला. आणि तो गमावलाही. थर्ड अंपायरच्या या निर्णयावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली. (Virat Kohli Vents Anger on Stump Mic After Dean Elgar Gets a DRS Reprieve)

रागाच्या भरात त्याने कॅमेरा पर्सनचीही शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने मार्करमला बाद करुन सलामी जोडी फोडण्यात यश मिळवले. त्यानंतर एल्गरही गळाला लागला. पण टेक्नोलॉजीनं त्याला साथ दिली आणि तो बराचवेळ मैदानात राहिला. तिसऱ्या दिवशीच्या खेळातील अखेरच्या षटकात बुमराहनं एल्गरला बाद केले. यावेळीही भारतीय संघाने रिव्ह्यू घेतला आणि तो यशस्वी ठरला.

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 22 व्या षटकात अचानक विराट कोहली स्टंम्प जवळ आला. फक्त आम्ही बॉल चमकवत नाही. आमचे विरोधी अर्थात आफ्रिकेचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही चेंडूला चकाकी आणण्याचा प्रयत्न करत होते. उगाच आमच्यावर सारखा कॅमेरा फिरवू नका, असे विराट कोहली स्टंम्प माइकवर येऊन बोलताना दिसले. डीआरसचा राग काढताना त्याने कॅमेरामनची शाळा घेत बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा मुद्दा उकरुन काढल्याचे पाहायला मिळाले. या वर्तणुकीचा विराटला काही फटका बसणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. त्याचा हा व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोहली आणि आक्रमकता याची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT