Virat Kohli won the ICC Men player of the month for October cricket news  sakal
क्रीडा

Virat Kohli : 'किंग कोहली' पहिल्यांदाच बनला 'ICC 'प्लेयर ऑफ द मंथ', ऑक्टोबर महिना ठरला लकी

'किंग' कोहली ठरला ICC 'प्लेयर ऑफ द मंथ

Kiran Mahanavar

Virat Kohli ICC Men Player Of The Month : एक काळ असा होता जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दबदबा पाहायला मिळत होता, पण गेल्या काही वर्षात किंग कोहलीच्या बॅटला धावा करत नव्हत्या. मात्र ऑक्टोबर 2022 पासून विराट कोहलीचे नशीब बदलू लागले आहे. विराट कोहलीला दीर्घ काळानंतर आयसीसीकडून पुरस्कार मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज ऑक्टोबर 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. 'किंग' कोहली ICC 'प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे.

विराट कोहलीला क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये प्रभावी कामगिरीसाठी ऑक्टोबर 2022 साठी ICC पुरूष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. शेवटी किंग कोहलीने दोन्ही खेळाडूंना पराभूत करत प्लेअर ऑफ द मंथचा किताब पटकावला. ऑक्टोबर महिन्यात कोहलीला फक्त 4 डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किंग कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली, ज्याला त्याने त्याच्या टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी म्हटले होते. 

विराट कोहलीने आतापर्यंत ICC क्रिकेटर ऑफ द डिकेड, ICC ODI क्रिकेटर ऑफ द डिकेड, ICC क्रिकेटर ऑफ द इयर, ICC ODI प्लेयर ऑफ द इयर, ICC टेस्ट प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकले आहेत. यातील अनेक पुरस्कार असे आहेत की विराट कोहलीने एकापेक्षा जास्त वेळा आपल्या नावावर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT