Rishabh Pant and Virat Kohli Sakal
क्रीडा

VIDEO : पंतचा उतावळेपणा पाहून कोहलीही चिडला!

सुशांत जाधव

मध्यफळीतील फलंदाजांनी पुन्हा निराश केले. रिषभ पंत तर उतावळेपणाचा शिकार झाला.

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडेत टीम इंडियावर व्हाईट वॉशची नामुष्की ओढावली. भारतीय संघाने पहिल्या दोन वनडेतील पराभवानं मालिका आधीच गमावली होती. पण किमान अखेरचा वनडे सामना जिंकून टीम इंडिया व्हाईटवॉश टाळेल, असा विश्वास टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्याला होता. पण टीम इंडियानं इथंही घोर निराश केले. शिखर धवन आणि विराट कोहलीनं डावाला आकार दिला. पण त्यानंतर मध्यफळीतील फलंदाजांनी पुन्हा निराश केले. रिषभ पंत तर उतावळेपणाचा शिकार झाला.

शिखर धवन (Shikhar Dhavan) बाद झाल्यानंतर लेफ्ट राईट कॉम्बिनिशनसाठी पंतला (Rishabh Pant) पुन्हा बढती मिळाली. पण तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. भारतीय संघाच्या (Team India) डावातील 23 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शिखर धवन (Shikhar Dhavan) बाद झाला. फेहलुकवायोच्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीनं (Virat Kohli) सिंगल काढून मैदानात आलेल्या पंतला स्टाईक दिले. कोणताही विचार न करता पंतने पुन्हा शॉट सिलेक्शनमध्ये चूक केली आणि झेलबाद होऊन परतला.

पहिल्याच बॉलला त्याने जो फटका खेळण्याचा प्रयत्न केला ते त्याच्यातील अपरिपक्वतेच दर्शन घडवणार होते. नॉन स्ट्राईकवर असलेल्या कोहलीलाही त्याचा हा फटका पाहून राग अनावर झाला. तो बाद होऊन तंबूत परतत असताना कोहलीने डोळे मोठे करून पंतकडे पाहताना दिसले. कोहलीची ही रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी भावना कोहलीच्या मनात आहे तिच भावना क्रिकेटचा सामना पाहणाऱ्या आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात कोहलीच्या अर्धशतकाशिवाय शिखर धवन आणि दीपक चाहरने अर्धशतकी खेळी केली. पण भारतीय संघाला तरीही पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या मैदानात 2020 मध्ये भारतीय संघाला 3-0 असा पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर पुन्हा भारतीय संघावर व्हाईटवॉशची नामुष्की ओढावली आहे. पंतशिवाय श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादवनं निराश केले. दोघांना चांगली सुरुवात मिळाली पण त्यांनी मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. त्यानंतर दीपक चाहरने टीम इंडियाला शेवटपर्यंत सामन्यात ठेवले. पण तो बाद झाला आणि सामना भारताच्या हातून निसटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT