Virender Sehwag Rohit Sharma esakal
क्रीडा

Virender Sehwag : दबाव टाळायचा असेल तर... धोनी - कर्स्टनचे उदाहरण देत विरूने रोहित सेनेला दिला मोलाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

Virender Sehwag Rohit Sharma : भारताने आशिया कपनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका 2 - 1 अशी जिंकली. यामुळे भारतीय संघाचा वर्ल्डकपपूर्वी आत्मविश्वास हा चांगलाच दुणावला आहे. मात्र वर्ल्डकपचा तेही मायदेशात होणाऱ्या वर्ल्डकपचा दबाव हा वेगळाच असतो. सर्व चाहत्यांच्या अपेक्षा या टिपेला पोहचलेल्या असतात. अशा परिस्थितीत दबाव हाताळणे खूप जिकीरीचे होते.

दरम्यान, भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाला एक मोलाचा सल्ला दिला. हा सल्ला देताना त्याने 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा संदर्भ दिला.

विरेंद्र सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, 'ज्यावेळी आमची टीम मिटिंग झाली त्यावेळी आम्ही न्यूजपेपर न वाचण्याचा नर्णय घेतला. आम्हाला बाहेरचा आवाज ऐकायचाच नव्हता. ज्या गोष्टी आमच्यावर अतिरिक्त दबाव टाकतील त्या सर्व गोष्टी आम्ही टाळायचा प्रयत्न केला. एकप्रकारे हा एक नियमच करण्यात आला. हा नियम सर्व खेळाडू कसोशीने पाळत होते.'

'आम्ही एकत्र रहायचो आणि मजा करायचो. आम्ही टीम बिल्डिंग उपक्रम देखील करत होतो. कारण मोठ्या स्पर्धेत तुम्ही भटकण्याची जास्त शक्यता असते. गॅरी आणि एमएस धोनी हे संघ एकसंध कसा राहील याची कायम काळजी घेत होते.'

सेहवागने सांगितले की धोनी कसा संघाला प्रोसेस फॉलो करण्यासाठी प्रोत्साहित करत होता. 'सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर आम्ही एकत्र येत होतो. त्यावेळी आम्ही क्रिकेटवर चर्चा करायचो. रात्रीच्या जेवणावेळी क्रिकेटच्या रणनितीची चर्चा होत होती. मी त्याला सल्ले देत होतो. आम्ही वर्ल्डकप जिंकण्याचे हे एक मुख्य कारण होते.'

'नक्कीच आमच्यावर दबाव होता. विमानतळावर सीआएसएफ कर्मचारी, हॉटेलमध्ये मॅनेजर आणि इतर कर्मचारी प्रत्येकजण सांगत होतं की वर्ल्डकप जिंकायचा आहे. मात्र धोनी एकच वाक्य सांगत होता. प्रोसेसवर लक्ष केंद्रित करा. आमची प्रोसेस उत्तम होती त्यामुळे आम्ही वर्ल्डकप जिंकलो.'

भारतातील वर्ल्डकपची सुरूवात ही 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारताचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT