Virender Sehwag on Adani Group crisis 
क्रीडा

Virender Sehwag: हे तर मोठे षडयंत्र... सेहवाग अदानींवरील हिंडनबर्ग रिपोर्टवर हे काय म्हणाला?

अदानी प्रकरणात विरेंद्र सेहवागची उडी

सकाळ डिजिटल टीम

Virender Sehwag on Adani Group: हिंडनबर्गच्या अहवालानंतर भारतीय बाजारपेठेतील प्रमुख समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. या अहवालानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. अदानी प्रकरणी नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणात भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने उडी घेतली आहे. (Virender Sehwag Hindenburg Adani report Goron Ko India Ki Tarakki Bardaasht Nahi Hoti )

सेहवागने ट्विट शेअर कर अप्रत्यक्षपणे 'हिंडेनबर्गवर हल्ला चढवला आहे. गोऱ्या लोकांना भारताची प्रगती सहन होत नाही. इतक नाही तर हे संपूर्ण प्रकरण म्हणजे नियोजित गट आहे.' असा धक्कादायक दावा सेहवागने केला आहे.

तसेच, किती ही प्रयत्न करा, पण भारत नेहमी प्रमाणे अजून मजबूतीने उभा राहिल. असही सेहवागने ट्विटमध्ये विश्वास व्यक्त केला आहे. सेहवागचे हे ट्वीट काही वेळातच व्हायरल होऊ लागले. यावर सर्व चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकांनी त्याच्या या ट्वीटला सहमतीही दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT