Virender Sehwag Unique Congratulations virat kohli for 100th Test match
Virender Sehwag Unique Congratulations virat kohli for 100th Test match  esakal
क्रीडा

'हाजमे की गोली अन् विराट कोहली' 100 व्या टेस्टसाठी सेहवागच्या हटके शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli 100th Test match: विराट कोहली मोहालीत आपला 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतातील अनेक दिग्गज खेलाडूंनी विराट कोहलीला या माईल स्टोनसाठी शुभेच्छा दिल्या. विराट कोहली (Virat Kohli) भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 12 खेळाडू ठरणार आहे. याचबरोबर तो दिल्लीचा भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)आणि इशांत शर्माने भारताकडून 100 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) आपल्या नेतृत्वाखाली खेळलेल्या विराट कोहलीला विरेंद्र सेहवागने व्हिडिओ मार्फत शुभेच्छा दिल्या. (Virender Sehwag Unique Congratulations virat kohli for 100th Test match)

सेहवागने विराटला आपल्या हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्याने चांगले यमक जुळवून विराट कोहलीची तुलना हाजमे की गोली आणि होली यांच्याशी केली. या व्हिडिओत सेहवाग विराटला आपण लहानपणापासून पाहत आलो आहे. मी त्याचा कर्णधार होतो. भारताकडून खेळताना विराट कोहलीने कमाल केली आहे. तो एक चांगला कर्णधार, फलंदाज आहे. याचबरोबर त्याने भारताला अनेक जबरदस्त विजय मिळवून दिले आहे असे म्हणाला.

याच व्हिडिओत सेहवागने विराट कोहलीची तुलना हाजमे की गोली आणि होली शी केली. तो म्हणाला 'मी म्हणतो की हाजमे की गोली, त्योहार में होली बॅटिंगमे कोहली पूरे भारत को पसंद हैं'

भारताकडून 100 वी कसोटी खेळणाऱ्या विराट कोहलीनेही देखील आपल्या भावना व्हिडिओ द्वारे व्यक्त केल्या. तो म्हणाला की, 'मी स्वतःला नशीबवान समजतो की मी 100 कसोटी सामने खेळू शकलो देवाची कृपा (God Is Kind) आहे. मी माझ्या फिटनेसवर खूप काम केलं. हा माझ्या आणि माझ्या कुटुंबियांसाठी मोठा क्षण आहे.' कसोटी क्रिकेटला अशीच पसंती मिळत राहो असेही विराट कोहली या व्हिडिओत म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT