Haryana Steelers vs Patna Pirates  Twitter
क्रीडा

आर्मी मॅनचा सुपर 10 शो; हरियाणासमोर पाटणाचा भांगडा!

पाटणाकडून आर्मी मॅन मोनूनं 15 गुणांसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला

सुशांत जाधव

Pro Kabaddi League 2021, Haryana Steelers vs Patna Pirates 6th Match : प्रो कबड्डीच्या दुसऱ्या दिवसातील अखेरच्या सामन्यात पाटणा पायरेट्सनं (Patna Pirates) हरियाणा स्टीलर्सला (Haryana Steelers ) अवघ्या 3 गुणांच्या फरकाने पराभूत केले. सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत झाली. फायनली पाटणाच्या संघाने 42-39 असा विजय नोंदवला. पाटणाकडून आर्मी मॅन मोनूनं (Monu Goyat) 15 गुणांसह पहिल्या सामन्यात सुपर 10 शो दाखवून दिला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच पाटणाच्या संघाचा विजय सुकर झाला. त्याच्याशिवाय कर्णधार प्रशांत कुमार राय (Prashanth Kumar Rai) आणि सचिननं ( Sachin) प्रत्येकी 7-7 गुणांची कमाई केली.

हरियाणा स्टीलर्सकडून रोहित गुलियानं (Rohit Gulia) 10 गुणांसह सुपर 10 ला गवसणी घातली. विकास खंडोला (Vikash Khandola) आणि जयदीप कुलदीप (JaideepKuldeep) यांनी अनुक्रमे 6 आणि 5 गुणांची कमाई केली. पण विजयासाठी त्यांची ही कामगिरी थोडी कमी पडली. अखेरच्या तीन मिनिटांचा खेळ बाकी असताना दोन्ही संघ 37-37 गुण मिळवून बरोबरीत होते. या तीन मिनिटात हरियाणाने 2 तर पाटणाने 5 गुण कमावले. इथच विजय-पराजयाच अंतर निश्चित झाले.

पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर असलेल्या पाटणा पायरेट्सनं दुसऱ्या हाफमध्ये दमदार कमबॅख केले. दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी हरियाणाला ऑल आउट केल. तत्पूर्वी हरियाणाने सुरुवातीला दिमाखदार खेळ दाखवला. त्यांनी अवघ्या 14 मिनिटांत पाटणा पायरट्सला ऑल आउट केलं होते. पहिल्या हाफमध्ये हरियाणाने 22 तर पाटणाच्या खात्यात 18 गुण होते. सरशेवटी पाटणाने 3 गुणांनी बाजी मारली.

प्रो कबड्डी स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे. पहिल्या दोन लढतीमध्ये गुजरात आणि दिल्लीने बाजी मारली होती. दिवसाच्या शेवटचा सामना पाटणाने जिंकला. स्पर्धेतील 12 ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना खेळला आहे. स्पर्धेतील सलामीच्या लढतीमध्ये 16 च्या फरकाने विजय नोंदवणारा यू मुम्बा गुणतालिकेत 5 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दबंग दिल्लीने पुण्याविरुद्धचा सामना 11 गुणांच्या फरकाने जिंकत 5 गुणासह दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. गुजरात, बंगाल वॉरियर्स आणि पाटणा प्रत्येकी एका विजयासह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. सलामीच्या दिवशी तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. हे दोन्ही संघ प्रत्येकी 3-3 गुणासह सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. हरियणा स्टीलर्स, यूपी योद्धा, जयपूर पिंक पँथर्स आणि पुणे पलटन पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT