Jaipur Pink Panthers vs Gujrat Giants Twitter
क्रीडा

Gujarat Giants नं रेकॉर्ड सुधारला, Jaipur Pink Panthers ला दिली मात

सुशांत जाधव, Spandana

Pro Kabaddi League 2021, Jaipur Pink Panthers vs Gujrat Giants Match 4th : प्रो कबड्डीच्या इतिहासातील गुजरात विरुद्धचा दरारा कायम राखण्यात जयपूर पिंक पँथर संघाला अपयश आले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने हातून गेलेला सामना आपल्या बाजून वळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. जयपूरच्या अर्जुन (ArjunDeshwal) याने सुपर 10 (super 10s) सह संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पण या कामगिरीनंतही त्याला आपल्या संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात अपयश आले.

कधी एक पाँइंट्सने गुजरात पुढे तर कधी जयपूरकडे एका पॉइंट्सची आघाडी अशा थरारक रंगतीत जयपूर पिंक पँथर 7 पाँइंट्सनी मागे राहिले. गुजरात जायंट्सने हा सामना 34-27 असा आपल्या नावे केला. गुजरातकडून राकेश नरवालने (Rakesh Narwal) सर्वाधिक पाँइट्स घेतले. जयपुर आणि गुजरात आतापर्यंत 8 वेळा एकमेकांना भिडले आहेत . यात पाच वेळा जयपुर पिंक पँथर्सने बाजी मारली आहे. दुसरीके दोनच सामन्यात गुजरात जायंट्सला यश आले होते. या दोन्ही संघातील एक सामना टाय राहिला होता. या सामन्यातील विजयासह गुजरातने आपल्या रेकॉर्डमध्ये सुधारणा केली आहे. 9 सामन्यानंतर दोन्ही संघात आता 5-3 असे अंतर आहे. Tackle मध्ये गरिष एर्नाकची त्याला उत्तम साथ लाभली. दोघांनी संघाला प्रत्येकी 7-7 गुण मिळवून दिले. या दोघांशिवाय राकेश संगोरियानं Raid मध्ये पाच गडी बाद केले तर बोनसच्या रुपात एक असे एकूण 6 गुणांची कमाई केली.

जयपुर पिंक पँथर्सने दोन गुणांची कमाई करत दमदार सुरुवात केली होती. खेळाच्या सुरुवातीच्या सात मिनिटांत जयपूरने आघाडी आपल्याकडे राखली होती. त्यानंतर गुजरातने सामना सहजासहजी सोडणार नसल्याचे दाखवून घेत पिछाडी भरून काढत अल्प आघाडी घेतली. राकेशनं सुपर रेडमध्ये 4 गुणांची कमाई करत 6 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही संघातील लढत 23-23 अशी बरोबरीत आली. 25-24 अशी आघाडी घेत जयपूर फ्रंटफूटवर होते. नवीनने विशालची जागा घेतली आणि सामन्यात पुन्हा ट्विस्ट पाहायला मिळाले. गुजरात 28-27 अशा स्कोअर लाईनसह जयपूरला बॅकफूटवर ढकलले. अखेरच्या पाच मिनिटांत गुजरातने सामना आपल्या बाजून वळला. त्यांनी 34 -27 अशी बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT