Vrinda Rathi Profile esakal
क्रीडा

Vrinda Rathi : नवी मुंबईच्या वृंदा राठीनं इतिहास रचला; भारत - इंग्लंड कसोटी सामन्यातील विक्रमांमध्ये अजून एकाची भर

अनिरुद्ध संकपाळ

Vrinda Rathi Profile : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर कसोटी सामना सुरू आहे. पहिल्याच दिवशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 410 धावा ठोकत विक्रम केला होता.

आता याच दिवशी नवी मुंबईतच वाढलेल्या वृंदा राठीने विक्रम केला. कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अंपायर होण्याचा मान वृंदानं पटाकावला.

वृंदा राठीने 2014 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित अंपायर्सची परीक्षा दिली होती. त्यानंतर चार वर्षांनी ती बीसीसीआयकडून आयोजित केली जाणारी अंपायरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाली.

तेव्हापासून 34 वर्षाच्या वृंदाने 13 वनडे आणि 43 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली आहे. 2020 मध्ये आयसीसी डेव्हलपमेंट पॅनल ऑफ अंपायर्समध्ये तिला बढती मिळाली. वृंदा राठीने 2022 च्या बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील अंपायरिंग केली आहे.

या वर्षी एका पाठोपाट एक अंपायरिंगचे रेकॉर्ड होत आहेत. 10 जानेवारी 2023 ला नारायण जननी आणि वृंदा राठी ही पुरूषांच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला अंपायर्स ठरल्या. या दोघांनी रणजी ट्रॉफी 2022 - 23 हंगामात गोवा आणि पाँडिचेरी यांच्या सामन्यात अंपायरिंग केलं होतं.

दक्षिण आफ्रिका येथे 2023 मध्ये झालेल्या महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील वृंदा राठीने अंपायरिंग केलं. ती प्रीमियर लीगची फायनल आणि एशियन्स गेममध्ये देखील अंपायरिंग करणारी भारताची पहिली महिला अंपायर ठरली.

इंग्लंडविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात वृंदासोबत भारताचे के अनंतपद्मनाभन ऑन फिल्ड अंपायर होते. तर वीरेंद्र शर्मा तिसरे पंच होते. तर जीएस लक्ष्मी या मॅच रेफरी आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Hike: आता फक्त 3 रुपये... पुढे किती महागणार पेट्रोल-डिझेल? धक्कादायक अहवाल समोर!

"त्यांना पॅरालिसीस झाला होता" दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा मोहन जोशींविषयी धक्कादायक खुलासा

NCP Leaders PC: तटकरे-पटेलांच्या नाराजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम! पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सरकारने किमान 20 रुपयात कांदा खरेदी करावा- शेतकरी

Monsoon Update: अंदमानात मान्सून आला रे! केरळात २६ मेपर्यंत पोहोचणार; कोकण किनारपट्टीवर कधी दाखल होणार?

SCROLL FOR NEXT