VVS Laxman Team India Head Coach  esakal
क्रीडा

VVS Laxman : कर्णधार झाला आता कोच बदलणार; द्रविडची जागा लक्ष्मण घेणार?

अनिरुद्ध संकपाळ

VVS Laxman Team India Head Coach : भारतीय संघ येणाऱ्या दोन वर्षात दोन वर्ल्डकप खेळणार आहे. यामुळे बीसीसीआयने आतापासूनच कंबर कसली आहे. संघातील बदल असो वा नेतृत्वातील बदल, बीसीसीआयने पुढाकार घेत अनेक मोठे निर्णय गेल्या काही दिवसांपासून घेण्याचा सपाटाच लावला आहे. 1 जानेवारीच्या रिव्ह्यू बैठकीतनंतर बीसीसीआयने अनेक गोष्टीत बदल केला आहे आता बीसीसीआयचे पुढचे लक्ष्य हे भारतीय संघाचा कोच आहे.

सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडचा कार्यकाळ 2023 च्या वर्ल्डकपपर्यंत आहे. बीसीसीआयने यानंतर राहुल द्रविडला कोणतीही मुदतवाढ देण्याच्या मूडमध्ये नाहीये. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआय सध्याचा एनसीएचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणला संघाचा मुख्य प्रशिक्षक करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राहुल द्रविडची नोव्हेंबर 2021 मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली त्यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मणचे देखील नाव चर्चेत होते. विशेष म्हणजे राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मणच भारतीय संघात काळजीवाहू प्रशिक्षकाची भुमिका बजावत होता. राहुल द्रविड कोरोनाग्रस्त झाल्यानंतर लक्ष्मणच आशिया कपमध्ये भारतीय संघासोबत होता.

सध्या लक्ष्मण एनसीएमध्ये उद्योन्मुख खेळाडू घडवत आहे. राहुल द्रविड देखील भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी एनसीएचा संचालकच होता.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT