Disney's Sports India Business ESAKAL
क्रीडा

Disney's Sports : भारतातील वर्ल्डकपचे स्ट्रिमिंग करूनही डिज्नेला झाला 2613 कोटी रूपयांचा तोटा?

Disney's Sports : डिज्ने जागतिक पातळीवरील स्पोर्ट्स बिजनेसमध्ये आहे फायद्यात मात्र भारतात त्यांना तोटा सहन करावा लागला

अनिरुद्ध संकपाळ

Disney's Sports India Business : जागतिक स्पोर्ट्स बिजनेसमध्ये वॉल्ट डिज्नेचे उत्पन्न वाढत आहे. डेज्ने, इएसपीएन आणि स्टार स्पोर्ट्स यांची देखील ग्लोबल स्पोर्ट्स बिजनेसमध्ये 4 टक्के वाढ झाली आहे. मात्र त्यांचे नुकसान हे जवळापस 37 टक्के झाले आहे.

वॉल्ट डिज्नेचा भारतातील स्पोर्ट्स बिजनेस 2023 च्या वनडे वर्ल्डकपमुळे जोरदार असेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आर्थिक पातळीवर चित्र काही वेगळेच आहे. कंपनीला डिसेंबर 2023 च्या शेवटच्या क्वार्टरमध्ये जवळपास 2613 कोटी रूपयांचा ऑपरेटिंग लॉस झाला आहे.

गतवर्षीपेक्षा हा लॉस जवळपास 144 टक्क्यांनी वाढला आहे. हा तोटा वर्ल्डकपसारखी मोठी स्पर्धेचे स्ट्रिमिंग करताना आलेल्या मोठ्या खर्चामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.

एकीकडे डिज्ने स्पोर्ट्स तोट्यात असताना त्यांच्याशीच निगडीत असलेल्या स्टार इंडियाला वर्ल्डकपमुळे फायदा झाला आहे. त्यांच्या उत्पन्नात जवळपास 71 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इकॉनॉमिक टाईम्स नुसार त्यांची ही वाढ प्रॉग्रामिंगमध्ये झालेली वाढ, प्रोडक्शन आणि योग्य प्रमाणात खर्चात झालेली वाढ यामुळे झाली आहे.

प्रति सामना सरासरी खर्चात झालेली वाढ आणि त्यात प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या सामन्यांच्या संख्येत झालेली मोठी वाढ यामुळे डिज्नेला हा ऑपरेटिंग लॉस झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जरी डिज्नेला भारतातील स्पोर्ट्स बिजनेसमध्ये तोटा झाला असला तरी काही ठिकाणी मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांचा जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्या व्ह्युवरशिपमध्ये देखील वाढ झाली असून जाहिरातीचे जास्त युनिट विकले गेला आहे. हे सर्व जाहिरातींचे दर थोडे घसरले असूनही घडले आहे.

विशेष म्हणजे स्टार इंडियाची स्ट्रिमिंग सेवा देणारे डिज्ने हॉटस्टार यांच्या सबस्क्रायबर बेसमध्ये देखील वाढ झाला आहे. तसेच प्रती युजर सरासरी उत्पन्नात देखील वाढ झाली आहे.

वर्ल्डकपचा डिज्नेला बसला मोठा फटका?

डिज्नेला भारतीय स्पोर्ट्स बिजनेसमध्ये झालेला तोटा हा त्यांच्यासमोरील आव्हनांना अधोरेखित करतो. भारतात क्रिकेट हा सर्वाधिक प्रसिद्ध खेळ आहे. प्रक्षेपणाचे हक्क मिळवण्यासाठी मोजावी लागलेली मोठी रक्कम आणि वर्ल्डकप सारखी मोठी स्पर्धेचे व्यवस्थापन करण्यासाठी आलेला खर्च यामुळे डिज्नेच्या फायद्यावर मोठा परिणाम झाला.

जागतिक स्तरावर डिज्ने स्पोर्ट्स, इएसपीएन आणि स्टार स्पोर्ट्स यांच्या उत्पन्नात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र ऑपरेटिंग लॉस हा 37 टक्क्यांनी घसरला. यामुळे एकूण नकारात्मक कामगिरीत भारतातील लॉसचा मोठा वाटा आहे.

डिज्ने आर्थिक वर्षाच्या तिमाहीत त्यांचा स्ट्रीमिंग बिजनेस हा फायद्यात आणण्यासाठी आखणी करत आहे. डिज्ने प्लसचे सबस्क्रायबर थोडे कमी झाले आहेत आणि सबस्क्रिप्शनची किंमत देखील वाढवली आहे तरी त्यांना विश्वास आहे की त्यांची कामगिरी सुधारेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT