Wanindu Hasaranga Breaks Down During Younger Sister’s Marriage 
क्रीडा

Wanindu Hasaranga : बहिणीच्या लग्नात आरसीबीच्या स्टार खेळाडू ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

Wanindu Hasaranga Viral Video : आगामी आशिया कप 2023 मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा खेळताना दिसणार आहे. मात्र याआधी हसरंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ढसाढसा रडताना दिसत आहे. खरं तर, हसरंगाच्या धाकट्या बहिणीचे लग्न होते.

आरसीबीचा स्टार खेळाडू वानिंदू हसरंगाच्या धाकट्या बहिणीने लग्नगाठ बांधली आहे. वनिंदू हसरंगा त्यांच्या निरोपाच्या वेळी खूप भावूक झाला. त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की, बहिणीला मिठी मारल्यानंतर हसरंगा खूपच भावूक झाला आणि बहिणीचे अश्रूही थांबत नाहीत. 1 मिनिट 21 सेकंदांचा हा व्हिडिओ इतका भावूक आहे, जो पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

अलीकडे लंका प्रीमियर लीग 2023 मध्ये वानिंदू हसरंगा चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली. तो देशांतर्गत लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने 10 सामन्यात 34.88 च्या सरासरीने 279 धावा केल्या आणि 10.74 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या.

आशिया कप 2023 सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील 4 क्रिकेटपटू दुखापतीमुळे आणि कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे स्पर्धेबाहेर जाऊ शकतात. वानिंदू हसरंगा आणि दुष्मंता चमीरा जखमी झाले आहेत, तर कुसल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांना कोरोनाची लागण झाली आहे. आशिया कप 2023 चे 4 सामने हायब्रीड मॉडेलमध्ये खेळले जातील आणि 9 सामने फक्त श्रीलंकेत खेळले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT