Wasim Akram Criticize BCCI Secretary Jay Shah  esakal
क्रीडा

Wasim Akram : पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणतो, जय शहा एक फोन करायचा होता...

अनिरुद्ध संकपाळ

Wasim Akram Criticize BCCI Secretary Jay Shah : बीसीसीआयमध्ये सचिव पदाची दुसरी टर्म मिळाल्या मिळाल्या जय शहा यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताला 2023 च्या वर्ल्डकपमधून पाकिस्तान माघार घेईल अशी धमकी दिली. या सर्व पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर भारत विरूद्ध पाकिस्तान वाद पेटला. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने थेट जय शहा यांच्यावरच टीका केली.

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम म्हणाला की पाकिस्तानने कसे क्रिकेट खेळायचे हे भारत सांगू शकत नाही. जर काही समस्या असेल तर जय शहा यांनी अशी वक्तव्य करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमिझ राजांशी वैयक्तिकरित्या बोलायला हवे होते.

अक्रम म्हणाला की, 'क्रिकेट बोर्डाने जबरदस्त वक्तव्य केलं आहे. भारत पाकिस्तानला कोणत्या प्रकारे क्रिकेट खेळायचे हे सांगू शकत नाही. पाकिस्तानमध्ये 10 ते 15 वर्षानंतर पुन्हा आंतरारष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले आहे. मी एक माजी खेळाडू आहे. राजकीय पातळीवर काय होतयं हे मला माहिती नाही. मात्र लोकांचा लोकांशी संपर्क महत्वाचा आहे.'

जय शहांबद्दल अक्रम म्हणाला की, 'जय शहा साहेब जर तुम्हाला बोलायचंच होतं तर तुम्ही आमच्या चेअरमनंना एक फोन करायला हवा होता. आशिया क्रिकेट परिषदेची एक बैठक आयोजित करायला हवी होती. तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं असतं त्यावर चर्चा झाली असती.'

अक्रम पुढे म्हणाला की, 'तुम्ही फक्त उभे राहून आम्ही जाणार नाही असं म्हणू शकत नाही. आशिया क्रिकेट परिषदेने आशिया कपचे आयोजन करण्याचा मान पाकिस्तानला दिला आहे. तुम्ही जे म्हणताय ते न्याय नाही.' अक्रमपूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनिसने देखील भारत पाकिस्तानला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची गरिमा ही क्रिकेट खेळण्यापेक्षा जास्त महत्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT