Wasim Akram IND vs PAK World Cup 2023 esakal
क्रीडा

Wasim Akram IND vs PAK : सामना कुठंही असू दे पाकिस्तानला... वसिम अक्रमने कंडकाच पाडला

अनिरुद्ध संकपाळ

Wasim Akram IND vs PAK World Cup 2023 : आयसीसीने नुकतेच भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकात पाकिस्तानने काही बदल करण्याची विनंती केली होती. मात्र आयसीसीने ही विनंती अमान्य केली. यानंतर पाकिस्तानचा संघ भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पीसीबीने देखील हा निर्णय सरकारवर सोपवून आपले हात वर केले.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने याबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त करत पीसीबी अन् पाकिस्तान सरकारला देखील घरचा आहेर दिला. क्रिकेट पाकिस्तानने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्या व्हिडिओत वसिम अक्रमने आपले मत व्यक्त केले.

अक्रम म्हणाला की, 'इथं कोणतीही समस्या नाहीये. सामना कोठेही असला तरी पाकिस्तानला तिथं खेळावच लागणार आहे. इथे चर्चा संपते. सामन्याच्या ठिकाणाबद्दल चर्चा होते त्यावेळी गरज नसलेला एक तणाव निर्माण होतो. जर तुम्ही कोणत्याही क्रिकेटपटूला विचारले तर त्यांना याच्याशी काय घेणदेणं नसतं. ते सामना कोठे आहे तेथे खेळण्यास तयार असतात.'

पाकिस्तानने यापूर्वीच वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे आयसीसीला पाकिस्तान शंभर टक्के वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येईल अशी अपेक्षा आहे. आयसीसी प्रवक्त्यांनी पीटीआयला सांगितले की, 'सर्व सदस्य संघांना त्यांच्या देशाचे कायदे आणि नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र पाकिस्तान भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी येईल याबाबत आम्हाला खात्री आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT