Wasim Akram Share Video Swimming With Three Piece Suit
Wasim Akram Share Video Swimming With Three Piece Suit esakal
क्रीडा

अक्रमने थ्री पीस सूट घालून केले स्विमिंग; म्हणाला आता तरी खूष आहात का?

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने (Wasim Akram) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज थ्री पीस सूट (Three Piece Suit) घालून स्विमिंग (Swimming) करताना दिसत आहे. अक्रमच्या या कृतीमुळे त्याचे फॅन्स बुचकळ्यात पडले. अक्रमने हा व्हिडिओ शेअर करून त्याला 'आता तरी तुम्ही खूष आहात? मी थ्री पीस सूट घालून स्विमिंग करत आहे.' असे कॅप्शन दिले. या व्हिडिओत अक्रम म्हणतो की, गरीबाची हाय आणि खुळ्यांचा सल्ला कधी घेऊ नये.' या व्हिडिओद्वारे वसिम आक्रमने जे लोक त्याला दुसऱ्या एका व्हिडिओवरून ट्रोल (Trolled) करत होते त्यांना टोला लगावला आहे.

वसिम अक्रम दुसऱ्या एका व्हिडिओत शर्ट न घालता अंघोळ करत होता. त्यावेळी काही लोकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोकांनी तुम्हाला बिना शर्ट अंघोळ करताना लाज वाटत नाही का? असा सवाल केला होता. या ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी अक्रमने थ्री पीस सूट घालून स्विमिंग केले. याचा व्हिडिओ टाकून त्याने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले. यावर भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने देखील कमेंट केली आहे. त्याने हसतानाचा इमोजी शेअर केला.

वसिम अक्रम संध्या क्रिकेट कॉमेंटरी करत आहे. वसिम अक्रमने पाकिस्तानकडून खेळताना कसोटी आणि वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने कसोटीत 414 तर वनडेमध्ये 502 विकेट घेतल्या आहेत. अक्रम हा 1992 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य होता. तर त्याच्या 1999 च्या आयसीसी वर्ल्डकपमध्ये अक्रमच्या नेतृत्वा खाली पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहचवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT