wasim akram swimming pool Viral Video 
क्रीडा

चड्डीवरुन ट्रोल केलं म्हणून पाकिस्तानी खेळाडू स्विमींगसाठी थेट थ्री पीस सूटवरच...

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरम सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत

Kiran Mahanavar

पाकिस्तानचा(Pakistan) माजी कर्णधार वसीम अकरम (Wasim Akram) सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अकरमने सोशल मीडियावर (Social Media) एक अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. वसीम त्या व्हिडिओमध्ये टीकाकारांना खास प्रत्युत्तर दिले आहे. ज्यामध्ये तो स्विमिंग पूलमध्ये सूट घालून उतरताना दिसत आहे. पूलमध्ये जाताना बहुतेक सहसा शॉर्ट्स घालतात, परंतु वसीम अकरम सूट घातलेला दिसत आहे. वसीम अकरमने या मागील मोठे कारण सांगितले आहे. गेल्या वर्षी वसीम अकरमने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो स्विमिंग पूलच्या आत खांद्यापर्यंत पाण्यात पोहताना दिसत होता. परंतु तरीही काही लोकांनी शर्ट घातला नसल्याबद्दल त्याच्यावर टीका केली होती. त्यामुळे या दिग्गजांनी अनोख्या पद्धतीने टीकाकारांना उत्तर दिलं आहे. (Wasim Akram Swimming Pool Video)

पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वसीम म्हणाला आहे की गेल्या वर्षी पूलमध्ये पोहतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. पण लोकांनी माझ्यावर शर्ट न घालता पोहल्याबद्दल टीका केल्या होत्या. त्यामुळे तुम्ही आता आनंदी रहा. मी थ्री-पीस सूटमध्ये पोहत आहे.

वसीम अकरमची गणना पाकिस्तानच्या महान गोलंदाजांमध्ये केली जाते असते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वसीम अकरम क्रिकेट विश्लेषक आणि समालोचक म्हणून काम पाहतो. पाकिस्तानकडून कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अकरमच्या नावावर आहे.

अकरमने 356 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.52 च्या सरासरीने 502 विकेट घेतल्या आहे. तर 104 कसोटी सामन्यांमध्ये अकरमच्या नावावर 23.62 च्या सरासरीने 414 बळी आहे. अकरम हा 1992 चा विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाचाही एक भाग होता. तसेच वसीम अकरमने 1999 च्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT