Wasim Jaffer sakal
क्रीडा

Wasim Jaffer : शमी-सिराजच्या वर्ल्ड कप तयारीवर वसीमने शेअर केले आफलातून मिम्स

बुमराह बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे पाहिले जात आहे पण...

Kiran Mahanavar

Wasim Jaffer : टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाठीच्या समस्येमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. या स्टार गोलंदाजीच्या अनुपस्थितीत भारताचे गोलंदाजी आक्रमण खूपच कमकवत दिसत आहे. बुमराह बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे पाहिले जात आहे. शमी वर्ल्ड कप स्टँडबायचा भाग आहे, तर बुमराहला दुखापत झाल्यानंतर सिराजची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र विश्वचषकासाठी हे दोन्ही खेळाडू किती तयार आहेत हा प्रश्न आहे.

मोहम्मद शमीने 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. सिराजने फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. या दोन खेळाडूंची संघात निवड झाली तरी त्यांच्याकडे तयारीसाठी फारच कमी वेळ आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने सोशल मीडियावर एक मजेदार मीम शेअर केला आहे. लिहिले की, हे दोन खेळाडूच्या विश्वचषकासाठी असे तयार होण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवड करण्यात आली होती, परंतु कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तो बाहेर गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 संघाचाही तो भाग नाही. टी-20 मालिकेनंतर भारताला एकाच संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. सिराज आणि शमी या दोघांनाही एकदिवसीय संघात स्थान मिळणे अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांना योग्य सराव करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'I Love Karad' आयलँडसमोरील वाहतूक बदल भोवला; कोल्हापूर नाक्यावरील मार्ग बदलल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, प्रशासनाचा ढिसाळ कारभार

Sant Balumama Temple Land Scam : आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात अतिग्रेच्या माजी सरपंचाला अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

टीम इंडियाचे 'Fantastic Four'! आयसीसीची मोठी घोषणा, जगात भारताच्या ८ खेळाडूंचा डंका

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम एकाच वेळी, राजू शेट्टी यांची जयसिंगपूरमध्ये शनिवारी ऊस परिषद

अनेकांनी पैसे बुडवले, पत्नीमुळे तरला! 'हे' काम करते 'दृश्यम ३'मधल्या गायतोंडेची बायको; दिसायलाही आहे इतकी सुंदर

SCROLL FOR NEXT