Wasim Jaffer Trolled Michael Vaughan Over 4 England Batsmen Out On Duck esakal
क्रीडा

ENG vs IND : थांबा आधी 'बदकं' एका रांगेत आणतो... जाफरनं वॉनला केलं ट्रोल

अनिरुद्ध संकपाळ

Wasim Jaffer : भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यात वनडे मालिका सुरू आहेत तर सोशल मीडियावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) आणि भारताचा माजी फलंदाज वसिम जाफर (Wasim Jaffer) यांच्यात सोशल मॅच सुरू आहे. भारताने पहिल्या वनडे सामन्यात (1st ODI) इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर मायकल वॉन शांत बसला नाही तर त्याने ट्विट करून वसिम जाफरला चिमटा काढला. त्याला आता वसिम जाफरने प्रत्युत्तर दिलं. सध्या जाफरचं हे ट्विट (Tweet) सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहेत.

भारताने इंग्लंड विरूद्धचा पहिला वनडे सामना 45 षटकाच्या आतच जिंकला. त्यामुळे एका डावाची देखील 50 षटके सामना चालला नाही. यानंतर मायकल वॉननने ट्वि केले की, 'मी संध्याकाळी रिकामा आहे वसिम जाफर चहाला जायचं काय?' वॉन याचा रोख हा सामना खूपच लवकर संपला याच्याकडे होता.

वसिम जाफरने या ट्विटला प्रत्युत्तर दिले, जाफरने ट्विट केले की, 'हो नक्कीच मायकल, आधी मला माझी बदकं एका रांगेत आणू दे!#ENGvIND' पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचे तब्बल 4 फलंदाज बदक मिळवत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. जाफरने याच मुद्यावून मायकल वॉनला चिमटा काढला. पहिल्या सामन्यात जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स आणि लिम लिव्हिंगस्टोन शुन्यावर बाद झाले होते.

पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने भेदक मारा करत इंग्लंडचा संपूर्ण डाव 110 धावात गुंडाळला. बुमराहने 19 धावात 6 तर मोहम्मद शमीने 31 धावात 3 बळी टिपले. तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटरलने सर्वाधिक 30 धावा केल्या.

भारताने इंग्लंडचे 111 धावांचे आव्हान 20 षटकाच्या आतच पार केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सावध सुरूवातीनंतर आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी नाबाद 111 धावांची भागीदारी रचत इंग्लंडचे आव्हान बिनबाद पार केले. रोहित शर्माने 58 चेंडूत नाबाज 76 धावांची तर शिखर धवनने 54 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT