Novak Djokovic Sakal
क्रीडा

Wimbledon 2024: 'Gooood Night', प्रेक्षकांच्या हुर्योला जोकोविचचं प्रत्युत्तर; रुनविरुद्ध विजयासह उपांत्यपूर्व फेरीतही धडक

Novak Djokovic: प्रेक्षकांच्या हुर्योनंतरही जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Novak Djokovic: विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममधील सोमवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत विचित्र घटना पाहायला मिळाली. क्रिकेट हा जंटलमन खेळ म्हणून ओळखला जातो, अगदी त्याचप्रमाणे विम्बल्डनच्या लढती पाहायला जंटलमन टेनिसप्रेमी तेथे पोहोचतात.

नोवाक जोकोविच - होल्गर रुन यांच्यामधील पुरुषांच्या एकेरीत मात्र कोर्टमध्ये बसून लढत पाहणाऱ्यांकडून हुर्यो उडवण्यात येत होती. नोवाक जोकोविच याने मात्र होल्गर रुन याच्यावर ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये विजय साकारत अगदी रुबाबात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या लढतीनंतर प्रेक्षकांच्या वर्तणुकीवर त्याने तीव्र नाराजी शब्दांत व्यक्त केली.

नोवाक जोकोविच - होल्गर रुन यांच्यामधील लढतीत प्रेक्षकांचा पाठिंबा रुनकडे होता. प्रेक्षकांकडून रुनच्याच नावाचा गजर सुरु होता. पण त्याच्या नावाचे उच्चारन करताना जोकोविचची हुर्यो उडवली जात आहे असेच वाटत होते.

जोकोविचने मात्र या हुर्योचा आपल्या खेळावर परिणाम होऊ दिला नाही. त्याने दोन तास व तीन मिनिटांमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केले. पण या विजयानंतर 'Gooood Night', असं म्हणत प्रेक्षकांच्या हुर्योला प्रत्युत्तर दिले.

होल्गर रुन याच्यावर विजय मिळवल्यानंतर नोवाक जोकोविच याने पत्रकार परिषदेत प्रेक्षकांच्या वर्तणुकीबद्दल कमालीची नाराजी व्यक्त केली.

तो म्हणाला, गेली २० वर्षांपासून मी टेनिस खेळत आहे. कशाप्रकारे अपमानित केले जाते हे मला चांगलेच माहीत आहे. यापेक्षा वाईट परिस्थितीमध्येही मी खेळलो आहे. अशा बाबींमुळे माझे लक्ष विचलित होत नाही. टेनिस या खेळावर प्रेम करणाऱ्या टेनिसप्रेमींचे मी आभार मानतो. प्रेक्षक रुनला समर्थन करीत होते, की हुर्यो उडवत होते मला माहीत नाही. पण अशा बाबी मी स्वीकार करू शकत नाही.

दरम्यान, होल्गर रुन याने प्रेक्षकांकडून कोणतेही गैरवर्तन झाले नसल्याचे सांगण्यात आले. तो म्हणाला, प्रेक्षक माझे नाव घेत होते. पण त्यांच्या उच्चारनामुळे ते हुर्यो उडवत असल्याचे वाटत होते. त्यामुळे सामन्याचा निकाल काही वेगळा लागला नाही. हेही लक्षात घ्यायला हवे.

अशा घटनांना रोखू शकत नाही

प्रेक्षकांकडून होणारी हुर्यो रोखण्यासाठी काय करायला हवे, असा प्रश्‍न केला असता नोवाक जोकाविच म्हणाला, प्रेक्षक खर्च करीत तिकीट विकत घेतात. त्यांना मनाप्रमाणे वागण्याची मुभा असते.

एखादवेळेस अति होत असेल तर खुर्चीवरील पंच मध्यस्थी करू शकतात. पण एक पूर्ण गट हुर्यो उडवत असेल, तर त्या पूर्ण गटाला स्टेडियमबाहेर काढू शकत नाही. अशा घटनांना रोखणे अवघड आहे.

फ्रिट्‌झचा सनसनाटी विजय

अमेरिकेच्या २६ वर्षीय टेलर फ्रिट्‌झ याने सोमवारी मध्यरात्री चौथ्या मानांकित ॲलेक्झँडर झ्वेरेव याच्यावर पाच सेटमध्ये सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

झ्वेरेव याने पहिले दोन सेट ६-४, ७-६ असे जिंकत २-० अशी आघाडी मिळवली होती. पण त्यानंतर फ्रिट्‌झ याने झोकात पुनरागमन केले. त्याने पुढील तीन सेटमध्ये ६-४, ७-६, ६-३ असे यश संपादन करताना आगेकूच केली. फ्रिट्‌झ याने तीन तास व २९ मिनिटांमध्ये विजय साकारला. झ्वेरेव पायाला झालेल्या दुखापतीसह लढत खेळला हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT