Football 6 Famous Sex Scandal esakal
क्रीडा

Football : सेक्स स्कँडल! कोणाला मागावी लागली होती होणाऱ्या पत्नीची जाहीर माफी?

अनिरुद्ध संकपाळ

Football 6 Famous Sex Scandal : जगात सर्वात ग्लॅमरस आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटूंची मक्तेदारी आहे. पैसा, फेम या बाबतीत गर्भश्रीमंत असणारे फुटबॉलपटू वादाच्या बाबतीत ही गर्भश्रीमंतच असतात. अशीच फुटबॉल जगतातील गाजलेली 6 सेक्स स्कँडल पाहुयात.

1 चेक रिपब्लिकचा संघ

चेक रिपब्लिक संघाने 1962 नंतर 2009 मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप पात्रता फेरी पार केली. मात्र त्यांच्या संघातील तब्बल 6 खेळाडू सेक्स स्कँडलमध्ये सापडल्यामुळे त्याच्या वर्ल्डकप स्वप्नाचा चुराडा झाला.

2 करीम बेंझेमा

फ्रान्सचे खेळाडू फ्रँक रिबेरी, करीम बेंझेमा हे खेळाडू वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या नाईट क्लबच्या वादात सापडले होते. यावेळी त्यांच्यावर या क्लबमध्ये सातत्याने जाण्याचा आरोप होत होता. याचा परिणाम 2010 च्या वर्ल्डकपवर पडला. संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला.

3 अमेरिकेचा कर्णधार जॉन हार्केस

अमेरिकेचा कर्णधार जॉन हार्केस याला संघातीलच एका खेळाडूच्या पत्नीसोबत संबंध असल्याच्या आरोपामुळे 1998 च्या वर्ल्डकप संघातून डच्चू देण्यात आला होता.

4 वेन रूनी

इंग्लंडचा सर्वात यशस्वी फुटबॉलपटू म्हणून ओळख असलेला वेन रूनी देखील सेक्स स्कँडलमध्ये अडकला होता. हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर त्याला जाहीररित्या त्याच्या होणाऱ्या पत्नीची कोलीनची माफी मागावी लागली होती.

5 मॅक्सिको संघ

2018 च्या वर्ल्डकपपूर्वी काही दिवस मॅक्सिकोचे खेळाडू जवळपास 30 वेश्यांसोबत मजा करताना आढळून आले होते. मात्र मॅक्सिकन फुटबॉल संघाने खेळाडू फ्री टाईममध्ये काहीही करण्यात मुक्त आहेत असे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले होते.

6 डेव्हिड बेकहम

इंग्लंडचा ग्लॅमरस फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमचे त्याच्याच एका माजी खासगी सहाय्यक रिबेका लूसशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप झाले होते. या बाबतचा गौप्यस्फोट 2004 मध्ये झाला होता. इंग्लिश फुटबॉल इतिहासातील हा सर्वात मोठा सेक्स स्कँडल होता. यावेळी बेकहम आणि व्हिक्टोरिया यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. त्यांना दोन मुले देखील होती.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT