WC 2023 IND Vs PAK Viewership Record Broken Again In India vs Pakistan sakal
क्रीडा

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा मोडला व्ह्यूअरशीपचा विक्रम! 3.5 कोटी प्रेक्षकांनी पाहिला OTT वर सामना

Kiran Mahanavar

WC 2023 IND Vs PAK Viewership Record Broken Again In India vs Pakistan : वर्ल्ड कप 2023 चा बारावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. सामन्यादरम्यान संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. सामना पाहण्यासाठी जवळपास 1.30 लाख प्रेक्षक नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले होते.

मैदानावर या सामन्याची क्रेझ सुरू असतानाच, ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवर विक्रमी संख्येने लोकांनी हा शानदार सामना थेट पाहिला. या वर्ल्डकपच्या सामन्याने प्रेक्षकसंख्येचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

हॉटस्टारवर तीन कोटींहून अधिक लोक भारत-पाकिस्तान सामना एकाच वेळी पाहत होते. हॉटस्टारने ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र, काही वेळात हा आकडा आणखी पुढे गेला. भारत-पाकिस्तानने त्यांचा स्वतःचा जुना विक्रम मोडला, जो त्यांनी एका महिन्यापूर्वी आशिया कप 2023 दरम्यान प्रस्थापित केला होता.

वास्तविक, जागतिक सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. याशिवाय चाहते डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. डिस्ने प्लस हॉटस्टार म्हणजेच OTT वर भारत-पाकिस्तान सामना थेट 3.5 कोटी लोकांनी पाहिला. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी क्रिकेटचा सामना लाइव्ह पाहिला नव्हता.

यापूर्वीचा विक्रमही भारत-पाकिस्तान सामन्याच्या नावावर आहे. आशिया कप 2023 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेला सुपर फोर सामना 2.8 कोटी लोकांनी थेट पाहिला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्वतः ट्विटर वर ही माहिती दिली होती. त्याचबरोबर या वर्ल्डकप भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अडीच कोटींहून अधिक लोकांनी थेट पाहिला.

भारत-पाकिस्तान सामन्याबाबत चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे, हे यावरून सिद्ध होते. इतकेच नाही तर या सामन्यासाठी आयसीसी, आशियाई क्रिकेट परिषद आणि बीसीसीआय खूप तयारी करतात. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 42.5 षटकात 191 धावांवरच मर्यादित राहिला. बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 30.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT