we are humans not robots grappler vinesh phogat critics
we are humans not robots grappler vinesh phogat critics sakal
क्रीडा

Vinesh Phogat : आम्ही खेळाडू आहोत, रोबोट नव्हे; विनेश फोगाट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ब्राँझपदक जिंकले. प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली. या स्पर्धेदरम्यान सामाजिक माध्यमांवर तिच्यावर टीका करण्यात आली होती. हाच धागा पकडून ती म्हणाली, ‘‘खेळाडूही मानव असतात. स्पर्धेची घोषणा झाली म्हणजे आम्ही रोबोटप्रमाणे कामाला लागायचे असे होत नाही. इतर देशांमध्येही ही संस्कृती नसेल.’’ आपल्या भारतामध्ये घरी बसून वक्तव्य करणाऱ्या तज्ज्ञांची कमी नाही, अशा शब्दांत विनेशने टीकाकारांना उत्तर दिले आहे.

‘‘भारतामध्ये असे बरेच लोक आहेत जे स्वतःला क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात. खेळाडूंनी त्यांचे करिअर कधी थांबवावे किंवा संपवावे, त्यांनी कधी खेळावे आणि खेळू नये यावर लोक भाष्य करू शकतात. तेव्हा ते खूप निराशाजनक असते,’’ अशी निराशा पुढे तिने व्यक्त केली.

संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करू

ती सांगते की, ‘‘ज्यांच्याकडे कठीण प्रवासात वारंवार स्वतःला सामोरे जाण्याची आणि लोकांची भीती न बाळगता स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आहे, अशा माझ्या सर्व सहकारी खेळाडूंना सांगू इच्छिते की, आम्ही सर्व एकाच पृष्ठावर आहोत. अशी आशा आहे की, एक दिवस आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, धैर्याने आणि समर्पणाने ही संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT