esakal
क्रीडा

CSK चा युवा खेळाडू सी. हरी निशांत अडकला लग्नबंधनात, VIDEO

धनश्री ओतारी

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सी. हरी निशांत नुकताच लग्नबंधनात अडकला. सीएसकेने शुक्रवारी सकाळी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर करून निशांतला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होता आहे.

सीएसकेने या नव्या जोडप्याचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटवर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निशांतच्या लग्नाचे काही क्षण दाखवण्यात आले आहेत. या खास क्षणांचा व्हिडीओ शेअर करत सीएसकेने दोघांनाही भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फ्रँचायझीने “हरीचे लग्न झाले! आम्ही तुम्हाला सुपर कपल’ म्हणून संबोधित करत आहोत.” असं म्हटलं आहे. निशांतच्या पत्नीचं नाव अनु आहे.

निशांतने नुकतचं आयपीएलमध्ये डेब्यू केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो तमिळनाडू संघाचा नियमित खेळाडू आहे. आयपीएल २०२२ मध्ये सीएसकेने सी. हरी निशांत (C Hari Nishanth) या युवा खेळाडूला खरेदी करण्यासाठी, त्याच्या बेस प्राईसएवढे म्हणजेच २० लाख रुपये खर्च केले. निशांत सीएसकेच्या संघात सहभागी असला, तरी त्याच्या आयपीएल पदार्पणाची प्रतिक्षा अजूनही संपली नाही.

२५ वर्षाच्या या खेळाडूने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या २०२०-२१ हंगामात त्याने जबरदस्त प्रदर्शन केले होत. त्याने या हंगामात ४१ च्या सरासरीने २४६ धावा केल्या होत्या. यामध्ये अंतिम सामन्यातील ३५ धावांची महत्वाची खेळीही सहभागी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT