Weightlifter Punam Yadav Miss Medal In Technical Point In Women 76 Kg Weightlifting In Commonwealth Games 2022 Birmingham esakal
क्रीडा

Commonwealth Games 2022 : तांत्रिक करणामुळे हुकले वेटलिफ्टर पुनमचे पदक

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) महिला 76 किलो वजनीगटात भारताच्या पुनम यादवचे (Punam Yadav) पदक तांत्रिक कारणामुळे हुकले. स्नॅच प्रकारात पुनम यादवने दुसऱ्या प्रयत्नात 95 त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 98 किलो वजन उचलले. ती स्नॅच फेरीनंतर पदकाच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर होती. मात्र क्लीन अँड जर्कमधील तिचे तिनही लिफ्ट अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकली गेली. पुनम यादवने 2018 च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील ती पदकाची प्रबळ दावेदार होती.

76 किलो महिला वेटलिफ्टिंमध्ये भारताच्या पुनम यादवने स्नॅच इव्हेंटमध्ये दुसऱ्या प्रयत्नात 95 तर तिसऱ्या प्रयत्नात 98 किलो वजन उचलले. स्नॅच प्रकारात कॅनडाच्या माया लेयलोरने 100 किलो वजन उचलून अव्वल स्थान पटकावले. तर पुनम यादव दुसऱ्या स्थानावर राहिली.

पुनम यादवचा क्लीन अँड जर्क प्रयत्नात 116 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर दुसरा प्रयत्नात देखील 116 किलो वजन उचलण्याचा तिचा प्रयत्न फसला.तांत्रिक कारणामुळे तिचा दुसरा लिफ्ट देखील अवैध ठरवण्यात आला. त्यानंतर तिने तिसरा लिफ्ट यशस्वीरित्या उचलला मात्र बारबेल बझर वाजण्यापूर्वीच खाली टाकल्याने तांत्रिकदृष्ट्या तिचा तिसरा लिफ्ट ग्राह्य धरण्यात आला नाही. क्लीन अँड जर्कमधील तीनही प्रयत्न अवैध ठरल्यामुळे पुनम यादवचे पदक हुकले.

कॅनडाच्या माया लेलॉरने एकूण 228 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर नायजेरियाच्या तैवो लियाडीने 216 किलो वजन उचलून रौप्य तर नरूच्या मॅक्सिमिना उएपाने 215 किलो वजन उचलत कांस्य पदक पटकावले. मायाने 228 किलो वजन उचलत गेम रेकॉर्ड देखील स्थापित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंकडून नाराजी उघड

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT