

Kolhapur political meeting Mumbai update
esakal
Kolhapur ZP president election news : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महायुती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पर्यायावर चर्चा करायची नाही, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत जागा वाटप हे समन्वयाने केले जाईल. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य, राजेंद्र पाटील-यड्रावकर गट हे महायुतीतील घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवतील. त्यामुळे ही महत्त्वाची निवडणूक इतर कोणत्याही पर्यायावर लढविली जाणार नाही, याची सर्वांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.
जागा वाटपासह इतर चर्चाही ज्या त्या वेळी कोल्हापुरात घेतली जाणार आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत कोणाला किती जागा दिल्या जाव्यात, याबाबतही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, मात्र एकत्रच ही निवडणूक लढविण्याबाबत सर्वांचे एकमत झाले.
सभासद संस्थांच्या यादीची छाननी अंतिम टप्प्यात
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) सभासद संस्थांच्या यादीची छाननी अंतिम टप्प्यात आली आहे. ही छाननी उद्या पूर्ण झाल्यानंतर नेमक्या किती संस्था अपात्र ठरणार आहेत, याची माहिती पुढे येणार आहे. छाननी उद्या (ता. ५) पूर्ण झाली तरीही प्रत्यक्षात ठरावासाठीची पत्रे नऊ मार्चनंतरच पाठविली जाणार आहेत.
‘गोकुळ’मधील सभासद संस्थांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये अनेक संस्था अपात्र ठरण्याची शक्यता आहे. साधारण १०० ते १२५ सभासद संस्था अपात्र ठरण्याची शक्यता आहे. संस्था अपात्र ठरू नये, यासाठी वेगवगेळ्या पातळींवर प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक संस्था एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करीत आहेत. त्यामुळे ताराबाई पार्क येथील दुग्ध विभागाच्या कार्यालयात सभासद संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.