West Indies WC 2023 
क्रीडा

West Indies WC 2023 : पाकिस्तानच्या हातात किल्ली! वेस्ट इंडिजसाठी वर्ल्ड कपचं उघडणार दरवाजे

Kiran Mahanavar

ICC World Cup Qualifiers 2023 : या वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कप भारतात खेळल्या जाणार आहे. दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारा संघ वेस्ट इंडिज या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

वेस्ट इंडिज संघाला वर्ल्ड कप 2023च्या पात्रता फेरीत स्कॉटलंडविरुद्ध 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर संघ वर्ल्ड कपच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला. पण वेस्ट इंडिजकडे अजूनही वर्ल्ड कपमध्ये पोहोचण्याची छोटी संधी बाकी आहे.

वेस्ट इंडिजचे सुपर सिक्समध्ये 0 गुण आहेत आणि आता पुढील दोन सामने जिंकल्यास त्यांना केवळ 4 गुणांपर्यंत पोहोचता येईल. झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आधीच 6 गुणांवर असल्याने त्यांच्यासाठी ते पुरेसे ठरणार नाही. सुपर सिक्समधील अव्वल दोन संघच 2023 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरतील. पण वेस्ट इंडिज संघासाठी बॅकस्टेज एंट्री होऊ शकते.

वेस्ट इंडिज वर्ल्ड कपसाठी कसे होईल पात्र?

वेस्ट इंडिज अजूनही वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकतो, पण त्यांची किल्ली पाकिस्तानच्या हातात आहे, पाकिस्तान सध्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सरकारकडून मंजुरी मागत आहे. म्हणजे पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतल्यास वर्ल्ड कप पात्रता फेरीतील तिसरा सर्वोत्तम संघ दोन्ही संघांसह वर्ल्ड कपच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करेल. पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, विश्वचषकात आमचा सहभाग सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असेल.

श्रीलंका आणि ओमानविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकले तरच विंडीज पहिल्या तीनमध्ये पोहोचू शकेल. मग त्यांना स्कॉटलंड किंवा नेदरलँड्सपैकी एकाने जास्तीत जास्त चार गुण मिळावेत आणि मग ते त्या संघाला निव्वळ धावगतीने पराभूत करू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: जळगावात भाजपाचे तीन सदस्य बिनविरोध विजयी

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT