World Cup | Captain Shai Hope | West Indies sakal
क्रीडा

West Indies WC 2023 : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार संतापला, पराभवाचे खापर कोणाच्या माथी फोडले

Kiran Mahanavar

West Indies ICC World Cup 2023 : विश्वचषक पात्रता फेरीत वेस्ट इंडिजला स्कॉटलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने वेस्ट इंडिजचे यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्नही भंगले. पराभवानंतर कर्णधार शाई होपने मोठे वक्तव्य केले आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपर सिक्स सामन्यात स्कॉटलंडने शनिवारी वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव केला. यासह वेस्ट इंडिजचा संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 48 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात वेस्ट इंडिजचा संघ या स्पर्धेचा भाग नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने पराभवानंतर संपूर्ण संघाच्या माथी खापर फोडले.(World Cup | Captain Shai Hope | West Indies)

सामना गमावल्यानंतर विंडीज संघाचा कर्णधार शाई होप म्हणाला, आम्हाला माहित होते की हा सामना खूप आव्हानात्मक असणार आहे. नाणेफेक खूप महत्त्वाची आहे. या मैदानावर जोही कर्णधार नाणेफेक जिंकतो, तो प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करतो. आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते. हा एक महत्वाचा सामना होता त्यामुळे झेल आणि मिसफिल्ड करायची नव्हती,

शाई होप पुढे म्हणाला, 'मला वाटते की आम्ही कोणत्याही सामन्यात आमचे 100 टक्के दिले नाही. आमची तयारी थोडी चांगली व्हायला हवी होती. आम्ही स्वत:ची तयारी केल्याशिवाय येथे खेळण्याचा विचारही करू शकत नाही. आमचे अजून 2 सामने बाकी आहेत. त्यामध्ये आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू. आमच्याकडे खूप प्रतिभा आहे, फक्त त्यात नियमितपणे चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ 43.5 षटकांत केवळ 181 धावाच करू शकला. स्कॉटलंडने वेस्ट इंडिजकडून 44 व्या षटकात 182 धावांचे लक्ष्य गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT