West Indies vs India 1st Test Day 3 esakal
क्रीडा

West Indies vs India 1st Test : वेस्ट इंडीज 3 दिवसातच गारद; भारताचा एक डाव अन् 141 धावांनी दणदणीत विजय

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 1st Test Day 3 : डॉमिनिका येथील विंड्सर पार्क कसोटीत भारताने वेस्ट इंडीजचा सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच एक डाव अन् 141 धावांनी पराभव केला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत आता 1 - 0 ने आघाडीवर आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 5 अन् दुसऱ्या डावात 7 अशा एकून 12 विकेट्स घेतल्या. फलंदाजीत भारताचा पदार्पण करणारा सलामीवीर यशस्वी जैसवालने 171 धावांची दमदार खेळी केली.

विंडीचा 130 धावात खुर्दा 

चहापानानंतर तिसऱ्या सत्रात अश्विनच्या फिरकीसमोर विंडीजचा संपूर्ण संघ 130 धावात गारद झाला. त्याने 7 विकेट्स घेतल्या. भारताने विंडीजचा एक डाव अन् 141 धावा राखून पराभव केला.

27-2 (19 Ov) : चहापान! विंडीजला दोन धक्के 

तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राचा खेळ संपला त्यावेळी वेस्ट इंडीजच्या 2 बाद 27 धावा झाल्या होत्या. वेस्ट इंडीज अजूनही 244 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून रविंद्र जडेजाने चंद्रपॉलला तर अश्विने कर्णधार क्रेग ब्रेथवेटला बाद केले.

8-1 : वेस्ट इंडीजला पहिला धक्का

भारताने पहिल्या डावात 271 धावाची आघाडी घेतल्यानंतर आपला डाव घोषित केला. यानंतर वेस्ट इंडीजची दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली झाली नाही. रविंद्र जडेजाने सलामीवीर तेगनारायण चंद्रपॉलला 7 धावांवर बाद केले.

भारताने डाव केला घोषित 

विराट कोहली 76 धावांवर बाद झाल्यानंतर भारताने आपला पहिला डाव 421 धावांवर घोषित केला. भारताने डाव घोषित केला त्यावेळी जडेजा 37 तर इशान किशन 1 धाव करून नाबाद होते. भारताने पहिल्या डावात 271 धावांची आघाडी घेतली आहे.

392-4 (140 Ov) : विराट कोहलीचे अर्धशतक, भारत 400 च्या जवळ

भारताचा रनमशिन विराट कोहलीने आपले 29 वे अर्धशतक पूर्ण केले असून अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजासोबत आक्रमक भागीदारी रचतोय. भारत 400 धावांच्या जवळपास पोहचला आहे.

यशस्वीचे द्विशतक हुकले

विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचणाऱ्या यशस्वी जैसवालला अखेर अल्झारी जोसेफने 171 धावांवर बाद केले. यशस्वीचे पदार्पणातच द्विशतक झळकावण्याचे स्वप्न भंगले. त्याने 387 चेंडूत 171 धावा केल्या.

IND 350/2 (125.3) : जैसवाल - विराटची शतकी भागीदारी 

विराट कोहली आणि यशस्वी जैसवालने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. यशस्वीने आपले दीडशतक पूर्ण केले असून विराटही अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे. भारताची आघाडी आता 200 पार पोहचली आहे.

यशस्वी जैसवालचे दीडशतक पूर्ण 

यशस्वी जैसवालने तिसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या षटकातच आपले दीडशतक पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT