West Indies vs India 2nd Test Virat Kohli  esakal
क्रीडा

West Indies Vs India 2nd Test : विराटने इतिहास रचला मात्र विंडीजनेही दिले कडवे प्रत्त्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 2nd Test Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 438 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने आपले शतक (121) पूर्ण केले. तर रविंद्र जडेजाने 61 धावांची आणि अश्विनने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. विंडीजने देखील आपल्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत दिवस अखेर पर्यंत 1 बाद 86 धावा केल्या.

WI 36/0 (17.5) : विंडीजची सावध सुरूवात 

भारताच्या पहिल्या डावातील 438 धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना विंडीजने सावध सुरूवात केली. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट आणि तेगनारायण चंद्रपॉलने 2 च्या धावगतीने 18 षटकात 36 धावा केल्या.

IND 438 (128) : भारताचा पहिला डाव संपुष्टात 

इशान किशन बाद झाल्यानंतर अश्विनने तळातील फलंदाजांच्या साथीने भारताला 438 धावांपर्यंत पोहचवले. मात्र 56 धावांची अर्धशतकी खेळी करून अश्विन बाद झाला.

 393-7  : भारताची मोठ्या धावसंख्येकडे कूच

भारताने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात आपली धावसंख्या 400 च्या जवळ पोहचवली आहे. इशान किशन 25 धावा करून बाद झाला आता सर्व मदार आर. अश्विनवर आहे.

विराट कोहली धावबाद 

विराट कोहलीला अल्झारी जोसेफने 121 धावांवर धावबाद करत भारताला पाचवा धक्का दिला.

IND 317-4 : विराट कोहलीचे 29 वे कसोटी शतक

विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटमधील आपला शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने आपले 29 वे कसोटी आणि 76 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT