West Indies vs India 2nd Test Day 3  esakal
क्रीडा

WI vs IND 2nd Test Day 3 : ब्रेथवेटची कडवी झुंज; तिसऱ्या दिवसअखेर विंडीजचा निम्मा संघ गारद

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 2nd Test Day 3 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांनी चांगलाच झुंजारपणा दाखवला. त्यांनी दिवसाचे पूर्ण तीन सेशन खेळून काढले. कर्णधार क्रेग ब्रेथवेटच्या दमदार 75 धावांच्या खेळीच्या जोरावर विंडीजने दिवसअखेर 5 बाद 229 धावा केल्या.

दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी अथनाझे 37 तर जेसन होल्डर नाबाद 11 धावा करून क्रिजवर होते. भारताला दिवसभरात विंडीजच्या चार विकेट घेण्यात यश आले. रविंद्र जडेजाने 2 तर सिराज, अश्विन आणि मुकेशने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

208-5 : विंडीजचा निम्मा संघ गारद 

क्रेग ब्रेथवेट 75 धावांची झुंजार खेळी करून बाद झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात विंडीजच्या मधल्या फळीने चांगला प्रतिकार केला. मात्र मोहम्मद सिराज, रविंद्र जेडजा आणि अश्विनला ठराविक अंतराने विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यात यश मिळाले.

157-3 : अश्विनने दिला दिलासा

वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 75 धावांची दमदार खेळी करत विंडीजला चांगल्या स्थितीत पोहचवले होते. मात्र अश्विनने त्याला बाद करत भारताला मोठा दिलासा दिला.

WI 140/2 (63) : ब्रेथवेटचे अर्धशतक

वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने अर्धशतकी खेळी करत विंडीजला 150 धावांच्या जवळ पोहचवले.

117-2 (51.4 Ov) : मुकेश कुमारने खाते उघडले

मुकेश कुमारने तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आपल्या कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. त्याने विंडीजकडून पदार्पण करणाऱ्या क्रिक मॅकेन्झीला 32 धावांवर बाद केले. मॅकेन्झीने कर्णधार ब्रेथवेटसोबत 46 धावांची भागीदारी रचली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT