West Indies Vs India 2nd Test Day 4  esakal
क्रीडा

WI vs IND 2nd Test Day 4 : विंडीजची झुंज, भारताने ठेवले 364 धावांचे मोठे लक्ष्य

अनिरुद्ध संकपाळ

West Indies Vs India 2nd Test Day 4 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने विंडीसमोर विजयासाठी 364 धावांचे आव्हान ठेवले. याच्या प्रत्युत्तरात विंडीजने दिवसअखेर 2 बाद 72 धावा केल्या आहेत.

भारताने विंडीजचा पहिला डाव 255 धावात गुंडाळल्यानंतर 183 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला. भारताकडून चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजने 5 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत रोहित शर्माने 57 आणि इशान किशनने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.

इशान किशनचे अर्धशतक, भारताने डाव केला घोषित 

पाऊस थांबल्यानंतर तिसऱ्या सत्रात भारताने आपल्या दुसरा डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला. इशान किशनने आपले कसोटीतील पहिले वहिले अर्धशतक पूर्ण केले.

118-2 (15 Ov) : पुन्हा पावसाचा व्यत्यय

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर थोड्याच वेळात पाऊस आल्याने सामना थांबवून लवकर लंच करण्यात आला. लंचनंतर भारताला दुसरा धक्का बसला. यशस्वी जैसवाल 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशनला बढती मिळाली. त्याने शुभमन गिलसोबत भारताला 15 षटकात 118 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पुन्हा पाऊस आल्याने सामना थांबला. खेळ थांबला त्यावेळी भारताकडे 301 धावांची आघाडी झाली आहे.

सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 98 धावा केल्या असताना पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. यामुळे खेळ थांबवावा लागला. खेळ थांबला त्यावेळी भारताकडे 281 धावांची आघाडी झाली होती.

IND 438 & 98/1 (11.5) : गॅब्रिएलने भारताला दिला पहिला धक्का

रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल हे आपल्या सलग तिसऱ्या शतकी सलामीच्या दिशेने कूच करत असतानाच गॅब्रिएलने रोहित शर्माला 57 धावांवर बाद केले. अखेर यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्माची सलामी भागीदारी 98 धावांवर संपुष्टात आली.

रोहित शर्माचे आक्रमक अर्धशतक

भारताने विंडीजचा पहिला डाव 255 धावात संपुष्टात आणल्यानंतर आपल्या दुसऱ्या डावात आक्रमक सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला यशस्वी जैसवालने देखील आक्रमक साथ दिली. या दोघांनी जवळपास 9 च्या सरासरीने 12 षटकात भारताच्या 98 धावा धावफलकावर लावल्या.

WI 255 (115.4) : मोहम्मद सिराजने विंडीजची शेपूट गुंडाळली

मुकेश कुमारने विंडीजला चौथ्या दिवशी सहावा धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराजने उरलेल्या चार फलंदाजांना फारशी वळवळ करण्याची संधी दिली नाही. त्याने विंडीजचा डाव 255 धावात गुंडाळला.

मोहम्मद सिराजने 60 धावा देत विंडीजचा निम्मा संघ गारद केला. आता भारताकडे पहिल्या डावात 183 धावांची आघाडी आहे.

वेगवान गोलंदाजांनी दिले धक्के 

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला त्यावेळी भारताचा पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने 37 धावांवर खेळणाऱ्या अथनाझेला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजने होल्डरला 15 धावांवर बाद करत विंडीजची अवस्था 7 बाद 223 धावा अशी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Petrol Explosion: पेट्रोलच्या भडक्यात भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Sharad Pawar : शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली चुकीची, शरद पवार यांचे मत; सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

SCROLL FOR NEXT