WI vs IND 2nd Test Day 5 esakal
क्रीडा

WI vs IND 2nd Test Day 5 : पावसामुळे दुसरा सामना अनिर्णित, भारताने मालिका 1 - 0 ने जिंकली

अनिरुद्ध संकपाळ

West Indies Vs India 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडीज आपला दुसरा डाव 2 बाद 76 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करणार होता. भारताला सामना जिंकण्यासाठी आठ विकेट्सची गरज होती तर विंडीजला विजयासाठी 289 धावा करण्याची गरज होती. मात्र पावसामुळे पाचव्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. अखेर दुसरा सामना अनिर्णित राहिला अन् भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 1 - 0 ने जिंकली.

सामना अनिर्णित 

पावसामुळे पाचव्या दिवशीचा संपूर्ण खेळ पाण्यात गेला. अखेर शेवटच्या सत्रातही पाऊस उसंत घेईना म्हटल्यावर पंचांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला.

पावसाचा पुन्हा खेळ

दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ विजयी मार्गावर असतानाच पाऊस विंडीजच्या मदतीला धावून आला. पावसामुळे पहिले सत्र वाया गेल्यानंतर लंच घोषित करण्यात आला. त्यानंतर ओल्या मैदानामुळे सामना सुरू होण्यास उशीर होत होता.

मात्र पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने दिवसाचे दुसरे सत्र देखील पाण्यात जाण्याची दाट शक्यता आहे.

पावसाची उसंत, खेळ सुरू होण्याची आशा 

अखेर एका सत्राता खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर आता कुठे पाचव्या दिवशीचा खेळ सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. आकाशातील काळे ढग दूर झाले आहेत. ग्राऊंड स्टाफ मैदान वाळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

पावसामुळे खेळ सुरू होण्यास विलंब

भारताला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी विंडीजच्या 8 विकेट्स घ्यायच्या आहेत. मात्र सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाऊस पडू लागल्याने खेळ सुरू होण्यास उशीर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT