west indies vs india 4th t20 funny memes after india thumping win in 4th t20i KL Rahul and Ishan Kishan cricket in marathi 
क्रीडा

WI vs IND : 'अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना', विजयानंतर KL राहुल अन् इशान किशनवर मीम्स व्हायरल

Kiran Mahanavar

West Indies vs India 4th T20 funny memes : वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा टी-20 सामना जिंकून भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत स्वतःला जिवंत ठेवले आहे. भारताला आता मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. गोलंदाजांपाठोपाठ भारतीय फलंदाजही लयीत दिसत आहेत. अशा स्थितीत वेस्ट इंडिजसाठी शेवटच्या सामन्यात पुनरागमन करणे सोपे जाणार नाही.

भारताकडून या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी धमाकेदार फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. या विजयानंतर यशस्वी जैस्वाल खूप आनंदी दिसली आणि सामन्यानंतरच्या सादरीकरणात कर्णधार हार्दिक पांड्याचे कौतुक केले.

यशस्वी जैस्वालची धमाकेदार फलंदाजी पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यादरम्यान काही चाहते केएल राहुल आणि इशान किशनवर मीम्सही बनवत आहेत. वास्तविक, केएल राहुल आणि इशान किशन हे सलामीवीरांच्या शर्यतीत आहेत. मात्र यशस्वीच्या या खेळीने या दोन्ही खेळाडूंना येत्या सामन्यांमध्ये संधी मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

चाहते सोशल मीडियावर केएल राहुल आणि इशान किशनबद्दल सतत पोस्ट करत आहेत. काही चाहते या फलंदाजांचे भविष्य धोक्यात असल्याचे सांगत आहेत. केएल राहुल दीर्घकाळ दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तर इशान किशनला पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळालेल्या संधींचा फायदा उठवता आला नाही. त्यानंतर त्यांच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणुकीनंतर २४ दिवसांत महागाईचा नवा धक्का! पेट्रोल, डिझेल ते खाद्यतेलापर्यंत किमती कशा वाढल्या? अजून किती वाढ बाकी?

स्टार प्रवाहच्या 'सुना येती घरा'ची वेळ ठरली ठरली; तेजश्री प्रधानच्या मालिकेला देणार टक्कर; कोणती मालिका घेणार निरोप?

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Shahaji Raje Bhosale Samadhi : शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील समाधीवर बसवली भव्य ४५० किलोची मेघडंबरी; पुणेकराचे अभिमानास्पद कार्य

चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT