West Indies vs India 4th T20I  esakal
क्रीडा

WI vs IND 4th T20I : शुभमन - यशस्वीची 165 धावांची सलामी; भारताचा मोठा विजय

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 4th T20I : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात भारताने विंडीजचा तब्बल 9 विकेट्स राखून पारभव केला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2 - 2 अशी बरोबरी साधली. आता उद्या (दि. 13) होणाऱ्या पाचव्या सामन्यात मालिकेचा विजेता ठरणार आहे. यशस्वी जैसवाल (84) आणि शुभमन गिलने (77) 165 धावांची दमदार सलामी दिली.

यशस्वी जैसवाल - शुभमन गिलची दिडशतकी सलामी 

शुभमन गिल आणि यशस्वी जैसवाल यांनी चांगल्या सुरूवाचीचे रूपांतर मोठ्या भागीदारीत केले. या दोघांनी 165 धावांची दमदार सलीमी दिली. मात्र गिल 46 चेंडूत 77 धावा करून शेफर्डच्या गोलंदाजीवर बाद झाला.

गिल - जैयसवालची हिट सलामी 

वेस्ट इंडीजने चौथ्या टी 20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात भारताची युवा सलामी जोडी शुभमन गिल आणि यशस्वी जैसवाल यांनी 5 षटकात नाबाद 50 धावा चोपल्या.

हेटमायरचे अर्धशतक, विंडीजही 150 पार 

होप बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरने विंडीजच्या डावाची सूत्रे आपल्या हातात घेत 35 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडीजने आपली धावसंख्या 150 पार पोहचवली.

युझीने जोडी फोडली

शाय होपने 29 चेंडूत 45 धावा चोपत हेटमायर सोबत 49 धावांची भागीदारी रचली होती. मात्र ही जोडी युझवेंद्र चहलने 13 व्या षटकात फोडली. त्याने होपला बाद करत विंडीजची अवस्था 5 बाद 106 धावा अशी केली.

104-4 (12.2 Ov) : होप - हेटमायरने डाव सावरला

विंडीजची अवस्था 4 बाद 57 अशी झाली असताना शाय होप आणि शिमरॉन हेटमायर यांनी पाचव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचत संघाला 12 व्या षटकात शतक पार करून दिले.

57-4 :कुलदीप यादवचा जलवा 

पॉवर प्लेमध्येच अर्धशतकी मजल मारणाऱ्या विंडीजला पहिले दोन धक्के अर्शदीप सिंगने दिले होते. पॉवर प्ले संपल्यानंतर कुलदीप यादवने आपल्या फिरकीचा जलवा दाखवला. त्याने निकोलस पूरनला आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलला प्रत्येकी 1 धावेवर बाद करत विंडीजची अवस्था 4 बाद 57 धावा अशी केली.

54-2 (5.4 Ov) : पॉवर प्लेमध्ये विंडीजची दमदार सुरूवात

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी केली. अर्शदीपने केयल मेयर्सला 17 धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर ब्रँडन किंग आणि शाय होप यांनी संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. अखेर पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अर्शदीपने किंगला बाद करत विंडीजला दुसरा धक्का दिला.

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली

वेस्ट इंडीजने चौथ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याने तिसऱ्या सामन्यातील आपले विनिंग कॉम्बिनेशन बदलले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT