IND vs WI ODI Series ESAKAL
क्रीडा

IND vs WI ODI Series : संघातील दिग्गज खेळाडू अचानक गायब... नव्या जर्सीच्या फोटोशूटवेळी मिळाले मोठे संकेत?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs WI ODI Series : वेस्ट इंडीज विरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या तयारीला लागला आहे. भारतीय संघ पहिल्या वनडे सामन्यासाठी बार्बाडोस येथे दाखल झाला असून टीम इंडियाच्या नव्या वनडे जर्सीचे देखील अनावरण करण्यात आले. या अनावरणावेळी भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू गायब होते. (Dream11 ODI India Jerseys Revealed)

ड्रीम 11 वनडे जर्सीचे अनावरण हे हार्दिक पांड्या, शुभमन गिल, इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेल्या 1 मिनिट आणि 18 सेकंदाच्या व्हिडिओत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटचे दोन मोठे ब्रँड अम्बेसिडर गायब होते. सहसा जर्सीच्या अनावरणावेळी या दोन दिग्गज खेळाडूंची प्रामुख्याने उपस्थिती असते.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका ही 27 जुलैपासून सुरू होणार आहे. पहिला सामना हा बार्बाडोस येथे होणार आहे. भारताने विंडीजविरूद्धती कसोटी मालिका 1 - 0 अशी जिंकली. आता ते वनडे सिरीजवर देखील कब्जा करण्यासाठी आपला जोर लावतील. भारतासाठी ही मालिका म्हणजे वनडे वर्ल्डकपची पूर्वतयारीच आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT